• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Saturday, May 23, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपानंतर कॉंग्रेसचीच ताकद; राष्ट्रवादीला अनुकुलता नाही !

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
29 May 2023
in Top News, राजकीय
image editor output image 634279421 1685379054152
32
SHARES
213
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

पुणे : पुणे शहरातील मध्य भागातील मतदारसंघ म्हणून ओळखला जातो त्या पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपानंतर कॉंग्रेसचीच ताकद जास्त असून या मतदारसंघात राष्ट्रवादीला अनुकुलता नसल्याचे मागील निवडणुकांच्या मतदानाच्या प्रमाणावरून स्पष्ट होत आहे. रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. पुणे महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या कॉंग्रेसच्या तुलनेत जास्त असली तरी लोकसभा मतदारसंघात केवळ कॉंग्रेसपेक्षा 3 नगरसेवक जास्त आहेत. मात्र, सदरील नगरसेवकांच्या मतांचे विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये मताधिक्य परावर्तीत होत नाही हे मागील निकालांवरून दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालेल्या मतांचा आधार जागावाटपात प्रबळ दावेदार ठरू शकत नाही. पुणे लोकसभा मतदारसंघातील समाविष्ट 6 विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पेक्षा कॉंग्रेसला मागील निवडणुकांमध्ये मते प्राप्त झाल्याचे दिसून येत असल्याने भाजपानंतर कॉंग्रेसचीच ताकद पुणे लोकसभा मतदारसंघात आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील समाविष्ट 6 विधानसभा मतदारसंघापैकी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदारसंघ मनसेला जागा सोडण्यात आल्याने या ठिकाणी राष्ट्रवादी व कॉंग्रेसने उमेदवार दिलेला नव्हता तर उर्वरित 5 पैकी कॉंग्रेसला 3 तर राष्ट्रवादीला 2 असे जागावाटप झालेले होते. यामध्ये केवळ वडगावशेरी मतदारसंघात राष्ट्रवादीला यश आले होते तर कॉंग्रेसला नुकत्याच झालेल्या कसबापेठ पोटनिवडणुकीत यश आलेले आहे. उर्वरित पर्वती व पुणे कॅन्टोन्मेंट शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मते राष्ट्रवादी व कॉंग्रेसला मिळालेली आहेत.
त्याप्रमाणे राष्ट्रवादीला वडगावशेरी मतदारसंघात विद्यमान आमदार सुनिल टिंगरे यांना 97 हजार 708 (45.52 प्रमाण) मते तर पर्वती विधानसभा मतदारसंघात अश्विनी नितीन कदम यांना दुसऱ्या क्रमांकाची 60 हजार 245 (34.67 प्रमाण) मते मिळाली होती अशी एकूण 1 लाख 57 हजार 953 मते राष्ट्रवादीला मिळालेली होती तसेच कॉंग्रेसला कसबापेठ पोटनिवडणुकीत विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना 73 हजार 309 (52.98 प्रमाण) मते तर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे दत्तात्रय बहिरट यांना दुसऱ्या क्रमांकाची 53 हजार 603 (39.98 प्रमाण) मते प्राप्त झाली होती आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे रमेश बागवे यांना दुसऱ्या क्रमांकाची 47 हजार 148 (37.25 प्रमाण) मते या प्रमाणे कॉंग्रेस एकूण 1 लाख 74 हजार 060 मते मिळाली होती ती राष्ट्रवादीच्या तुलनेत जास्त आहेत.
2017 च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला मुंबईत (२ लाख ८४ हजार), अन्य नऊ महापालिकांमध्ये (३४ लाख, १७ हजार) तर जिल्हा परिषदांमध्ये (५६ लाख ९३ हजार) मते मिळाली. राष्ट्रवादीच्या एकूण मतांची संख्या ही ९२ लाखांच्या आसपास आहे. तर काँग्रेसला मुंबईत (८ लाख २९ हजार), अन्य नऊ महापालिका (३० लाख) तर जिल्हा परिषदा (४९ लाख ७२ हजार) मते मिळाली. काँग्रेसच्या एकूण मतांची संख्या ही ८९ लाख आहे. मनसेला मुंबईत चार लाख अन्य अन्य महापालिकांमध्ये नऊ लाख मते मिळाली आहेत. एमआयएमला मुंबई २.५५ टक्के मते मिळाली आहेत.
पुणे लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी दावा करीत आहे मात्र या मतदारसंघात प्रबळ व प्रभावी उमेदवार अद्यापही इच्छुक म्हणून पुढे आलेला नाही केवळ शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली मात्र ते शिरूर लोकसभा अंतर्गत हडपसर विधानसभा मतदारसंघात त्यांचे कार्यक्षेत्र आहे. माजी महापौर व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष म्हणून पुण्याच्या मध्यवस्तीतील मतदारांच्या कितपत पसंतीत उतरतील त्याबाबत पक्षांतर्गतच साशंका व्यक्त केल्या जात आहेत. राष्ट्रवादीच्या तुलनेत कॉंग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशींची व उमेदवारी प्रभावी ठरत असून त्यांना मागील 3 लोकसभा लढविण्याचा अनुभव आणि निवडणुकांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवलेली आहेत त्यामुळे मागील निवडणुकांच्या मतदानाच्या तुलनेत भाजपानंतर कॉंग्रेसचे प्राबल्य या लोकसभा मतदारसंघात असल्याचे दिसून येत आहे.

पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या चारपैकी तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, तर पुणे शहरातून काँग्रेस निवडणूक लढविते. महाविकास आघाडी झाल्यानंतर तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसकडून आपल्याकडे खेचण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरु आहेत. या मतदारसंघातील गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपचे अनिल शिरोळे आणि गिरीश बापट यांनी तीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजय नोंदविले. बापट यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. त्या जागेसाठी पोटनिवडणूक होण्याची शक्यता गृहीत धरून सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागा वाटपात अनेक वर्षे ही जागा काँग्रेसकडे आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळावी. महाविकास आघाडीचे नेते जागा वाटपाचा निर्णय घेतील असे काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर 1999 च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष समोरासमोर उभे ठाकले होते. त्या वेळी भाजपचे प्रदीप रावत 42 टक्के मते मिळवीत विजयी झाले. दुसर्‍या क्रमांकावरील काँग्रेसचे मोहन जोशी यांना 29 टक्के, तर राष्ट्रवादीचे उमेदवार व तत्कालीन खासदार विठ्ठल तुपे यांना 27 टक्के मते मिळाली होती. त्यानंतर दोन्ही पक्षांची राज्यात आघाडी झाली. 2004 मध्ये काँग्रेसचे सुरेश कलमाडी सुमारे पाऊण लाख मताधिक्याने जिंकले, तर 2009 मध्ये मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर कलमाडींचे मताधिक्य 25 हजारांपर्यंत घसरले. त्या वेळी मनसेने 75 हजार मते मिळविली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीची ताकद उपनगरांत जास्त आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर भाजपची ताकद वाढली. पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभांपैकी राष्ट्रवादीकडे वडगाव शेरी हा एक मतदारसंघ असून, कसबा पेठ मतदारसंघ काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी पोटनिवडणुकीत भाजपकडून खेचून घेतला. पुणे कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर मतदारसंघांत काँग्रेसच्या उमेदवारांनी चांगली लढत दिली. दोन्ही ठिकाणी कमी फरकाने काँग्रेस पराभूत झाली होती.

पुणे महापालिकेच्या गेल्या 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 42 नगरसेवक निवडून आले, तर काँग्रेसचे 10 नगरसेवक निवडून आले.
मात्र, काँग्रेसचे दहाही नगरसेवक पुणे लोकसभा मतदारसंघातील आहेत, तर या भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या तेरा होती.
राष्ट्रवादीचे उर्वरित 29 नगरसेवक हडपसर व खडकवासला मतदारसंघांतील प्रभागांतून निवडून आले होते.
आमदार आणि नगरसेवकांच्या संख्येपेक्षा मतदानाची संख्या राष्ट्रवादीपेक्षा कॉंग्रेसची वरचढ ठरत आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाची ताकद राष्ट्रवादी व कॉंग्रेसपेक्षा जास्त असून युती व महाविकास आघाडीत
सरळ लढत झाल्यास निवडणूक चुरशीची होऊ शकते. भाजपकडून दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबात
उमेदवारी देण्याची शक्यता आहे. महापौर प्रशांत जगताप यांनी येथून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
माजी आमदार मोहन जोशी, रोहित टिळक माजी उपमहापौर दीपक मानकश
अरविंद शिंदे, माजी मंत्री रमेश बागवेंची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे
तर भाजपमध्येही नऊ-दहा महिने खासदार होण्यासाठी माजी आमदार मेधा कुलकर्णी
माजी महापौर मुरलीधर मोहोळ , शहराध्यक्ष जगदीश मुळीक
बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापट यांच्यात चुरस आहे. दरम्यान जूनअखेरीस
मतदान घेण्याचा विचार सुरू असल्याचे निवडणूक आयोगाच्या प्रक्रीयेवरून दिसून येते.
लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील संसदेतील सदस्यत्व अवघे काही महिन्यांच्या कालावधीचे आहे
त्यामुळे अल्पकालीन खासदारकीसाठी इच्छुकांची संख्या देखील नगण्य दिसून येत आहे. #सत्यप्रभा न्यूज

Previous Post

चेन्नईचा विस्फोटक फलंदाज अंबाती रायडूची निवृत्तीची घोषणा, IPL मधील गुजरातविरुद्धचा अंतिम सामना खेळणार

Next Post

छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे बुधवारी भोकर येथे आयोजन

Next Post
image editor output image 1966768494 1685404291454

छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे बुधवारी भोकर येथे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • बॉक्स ऑफिसवर देऊळ बंद २ चा धमाका ! प्रवीण तरडे यांच्या चित्रपटाची पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई
दहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या देऊळ बंद २ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. प्रवीण तरडे यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे दणदणीत सुरुवात केली असून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटसृष्टीत नेहमी शुक्रवारच्या मुहूर्तावर नवनवीन चित्रपट प्रदर्शित करण्याची पद्धत आहे. मात्र या परंपरेला फाटा देत गुरुवारी २१ मे रोजी पहाटे साडेपाच वाजता म्हणजेच ब्राह्ममुहूर्तावर या चित्रपटाचे शोज सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे या भल्या पहाटेच्या शोजलाही सर्व सिनेमागृहे खचाखच भरलेली पाहायला मिळाली.
सध्या भारत भरात या चित्रपटाचे ५०० सिनेमागृहांमध्ये तब्बल दोन हजारांहून अधिक शोज अत्यंत यशस्वीरीत्य�
  • फडणवीसांची गँगच जर अशा पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढत असेल, तर बिचाऱ्या पोलिसांना दोष देऊन काय उपयोग? फडणवीस हे अंशकालीन गृहमंत्री आणि पूर्णकालीन नेहरू-गांधी-ठाकरे विरोधक म्हणूनच इतिहासात नोंदवले जातील.
.
#SushmaAndhare #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #BreakingNews #SatyaprabhaNews
  • साली डरपोक जनता पार्टी ! BJP नाव बदला आणि DJP करा. लाज वाटायला पाहिजे साल्याहो. तुम्हाला तुमचं चानेल ग्रोव करायला 14 वर्षे लागले. जवान पोट्यांनी चार दिवसात करून दाखवलं. : नितेश कराळे प्रवक्ते राष्ट्रवादी श.प.
.
#niteshkarale #cokroachjantapart #BreakingNews #SatyaprabhaNews #MarathiNews
  • मनोज जरांगे आता डीलपती झाले आहेत, असं माझं सरळ म्हणणे आहे.. - लक्ष्मण हाके , ओबीसी आरक्षण आंदोलक
.
#laxmanhake #manojjarangepatil #SatyaprabhaNews #maharashtra #MarathiNews
  • कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून तरुणांच्या मनातील भडास व्यक्त केली जातेय.आज प्रत्येक माणूस उठतोय आणि कॉकरोच जनता पार्टीचा सदस्य म्हणतोय, सोशल मीडियाला टाकतोय.एका क्लिकवर जग एकत्र आलेलं आहे, त्यामुळं सत्ताधाऱ्यांनो तुम्हाला घरी बसवायला नवीन पिढी, Gen-Z मागं पुढं बघणार नाही. त्यामुळं सावध असा नाहीतर तुमचा कार्यक्रम करेक्ट होईल.
-लक्ष्मण हाके(ओबीसी आरक्षण आंदोलक)
.
#laxmanhake  #cockroachjantaparty  #IndianPolitics  #MarathiNews #SatyaprabhaNews
  • इटलीमध्ये जाऊन तिथल्या महिला राष्ट्राध्यक्षांना चॉकलेटची भेट देणं कितपत योग्य आहे? पंतप्रधानांचे हे वर्तन हास्यास्पद आहे.
.
#NanaPatole #SatyaprabhaNews #NarendraModi #BreakingNews #MarathiNews
  • नीट पेपरफुटी प्रकरणी डॉ. मनोज शिरुरेला सीबीआयकडून अटक; मोटेगावकरकडून स्वत:च्या मुलासाठी खरेदी केलेला पेपर
.
#manojshirure  #neetexam  #maharashtra  #MarathiNews #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10439
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8175
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6327
Santosh Ambekar

“मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड” संतोष आंबेकर यांना प्रदान

20 May 2026
IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
britain pm Keir starmer

Political News : मोठा राजकीय भूकंप? पंतप्रधान राजीनामा देण्याच्या तयारीत; ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग

18 May 2026
Rupali Chakankar

रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं

14 May 2026

Recent News

Santosh Ambekar

“मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड” संतोष आंबेकर यांना प्रदान

20 May 2026
IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
britain pm Keir starmer

Political News : मोठा राजकीय भूकंप? पंतप्रधान राजीनामा देण्याच्या तयारीत; ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग

18 May 2026
Rupali Chakankar

रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं

14 May 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Santosh Ambekar

“मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड” संतोष आंबेकर यांना प्रदान

20 May 2026
IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज