Uddhav-Raj Thackeray Alliance | मुंबई | महाराष्ट्रातील राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) काही दिवसांच्या परदेशी दौऱ्यावरती गेल्याची माहिती आहे. दोन्ही पक्षाचे नेते मुंबईमध्ये परत आल्यानंतर युतीबाबत निर्णय घेतील, चर्चा करतील अशी माहिती दिली होती.
त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेली सोशल मिडिया एक्सवरील पोस्ट चर्चेत आली आहे. “वेळ आलीये, एकत्र येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी” अशा आशयाची पोस्ट शिवसेना ठाकरेंच्या पक्षाच्या अधिकृत पेजवरून करण्यात आली आहे. | Uddhav-Raj Thackeray Alliance |
ठाकरेंच्या पक्षाने केलेल्या या एक्स पोस्टमधून ठाकरेंची शिवसेना मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी एकत्र येण्याची साद सर्वांना घालत आहे.(Uddhav-Raj Thackeray Alliance) एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरू असताना अशा प्रकारे ठाकरेंच्या शिवसेनेकडून केलं जाणारी एक्स पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. मागील आठवड्यात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना युतीसाठी टाळी दिली होती आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिलेली प्रतिटाळी चर्चेचा विषय बनली होती.