• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, April 22, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र मुंबई

Raj Thackeray: बँकांमधलं आंदोलन थांबवा, उदय सामंतांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

Satyaprabha News by Satyaprabha News
5 April 2025
in मुंबई, Top News, महाराष्ट्र
Raj Thackeray: बँकांमधलं आंदोलन थांबवा, उदय सामंतांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
32
SHARES
213
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

मुंबई : नुकताच पार पडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दसरा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या मनसेसैनिकांना राजआज्ञा देत पुन्हा एकदा मराठीचा (Marathi Language) आग्रह बोलून दाखवला. यावेळी त्यांनी राज्यभरातील मनसैनिकांनी बँकांमध्ये जाऊन या बँकेतील व्यवहारात मराठी भाषेचा वापर केला जातो की नाही, याची तपासणी करा, बँकांना निवदेन द्या, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मनसैनिकांनी राज्यभरातील अनेक भागातील बँकेत जाऊन मराठी भाषेचा आग्रह धरत गोंधळ घातल्याच्या घटना समोर आल्या.

मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपला आदेश मागे घेत मराठीच्या मुद्द्यावरील आंदोलन मागे घेण्याचे आदेश दिले आहे. राज ठाकरे यांनी या संदर्भात एक पत्र काढून हे आंदोलन थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारने बँकांना मराठीचा सन्मान करायला लावायला हवा. कायदा हातात घेण्याची आमचीही इच्छा नाही. तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की. असेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या पत्रातून म्हटले आहे. महाराष्ट्र सैनिकांनो, तूर्तास आंदोलन थांबवा पण या मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका, असे आदेशही त्यांनी यावेळी मनसेसैनिकांना दिले आहे.

दुसरीकडे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज(5 एप्रिल) भेट घेतली आहे. बँकांमध्ये मराठी बोलत नसल्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी मंत्री उदय सामंत यांना बोलावलं होतं. अशातच आज मंत्री सामंत यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत हा महत्त्वाचा निर्णया झाला असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील ज्या बँकांचे व्यवहार मराठीत होत नाही यासाठी सर्व समित्याची बैठक घेणार असल्याचं त्यांनी सांगितले. तसेच या बाबत काय कारवाई करता येईल याबाबत निर्णय घेणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना.. सस्नेह जय महाराष्ट्र. सर्वप्रथम महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा जो एक जोरदार आवाज उठवलात त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात तुम्हाला आदेश दिला होता की महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होत आहेत की नाही हे पहा, आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव त्या बँकेच्या प्रशासनाला करून द्या. दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही महाराष्ट्रात सर्वदूर बँकांमध्ये गेलात, तिथे मराठीचा आग्रह धरलात, हे उत्तम झालं; यातून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना कोणी गृहीत धरू शकत नाही हा संदेश जसा गेला, तसंच सर्वदूर असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक ताकद पण दिसली. पण आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण आपण या विषयांत पुरेशी जागृती केली आहे, आणि हे घडलं नाही तर काय होऊ शकतं याची चुणूक दाखवली आहे.

आता मराठी जनतेनेच आग्रह धरायला हवा आणि आपल्या मराठी समाजानेच जर कच खाल्ली, तर मग ही आंदोलने तरी कशासाठी करायची? आणि सगळ्यात महत्वाची जबाबदारी सरकारची आहे. रिझर्व्ह बँकेचा नियम त्यांना माहीत आहे आणि त्या नियमाची अंमलबजावणी करून घेणं ही आता सरकारची जबाबदारी आहे. काल कुठेतरी माध्यामांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही. तशी इच्छा आम्हालाही नाही, पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का ? तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की.

त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांनो, तूर्तास आंदोलन थांबवा पण या मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका ! सरकारलाही माझे सांगणे आहे की परत कुठे नियम पाळला जात नसेल, आणि मराठी माणसाला गृहीत धरलं जात असेल, किंवा अपमान केला जात असेल तर पुन्हा तिथे माझे महाराष्ट्र सैनिक त्यांच्याशी चर्चा करायला अवश्य जातील !

Tags: MaharashtraMaharashtra NewsMarathi LanguagePolitical Newsraj thackeraySatyaprabha NewsUday Samant
Previous Post

Breaking News : यापुढे इमर्जन्सी रुग्णांकडून डिपॉझिट घेणार नाही, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा निर्णय

Next Post

Karuna Munde: मला प्रेमात अडकवून लग्न करणाऱ्याला २० कोटींची ऑफर; करुणा मुंडेंचा आरोप

Next Post
Karuna Munde: मला प्रेमात अडकवून लग्न करणाऱ्याला २० कोटींची ऑफर; करुणा मुंडेंचा आरोप

Karuna Munde: मला प्रेमात अडकवून लग्न करणाऱ्याला २० कोटींची ऑफर; करुणा मुंडेंचा आरोप

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • Sanjay Raut On Devendra Fadnavis :
  • बनावट कागदपत्रांच्या आरोपांवर सहर शेख आक्रमक; न्यायालयात उत्तर देईन– सहर शेख#SaharShaikh #AIMIM #SatyaprabhaNews #LegalAction  #BreakingNews
  • अजितदादा आणि मी घराणेशाहीचे प्रॉडक्ट आहोत. पण, शरद पवार हे परिवारवाद नाहीत. त्यांनी शून्यातून विश्व उभं केलं. त्याच ८० वर्षांच्या योद्धाला पक्षातून काढून टाकलं.#SatyaprabhaNews #PoliticalNews #SupriyaSule  #AjitPawar #SharadPawar
  • महिला आरक्षणावर खुल्या चर्चेस काँग्रेस तयार; मुख्यमंत्र्यांनी सांगावे कधी व कुठे चर्चा करायची? मोदींनाही चर्चेला बोलवा.: मा. प्रणिती शिंदे
खासदार - सोलापूर लोकसभा#PranitiShinde #Congress #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • बिग बॉस मराठीचा प्रवास माझ्यासाठी खूप खास आणि शिकवणारा ठरला. या घराने मला स्वतःला ओळखायला शिकवलं, प्रत्येक परिस्थितीत ठाम राहायला शिकवलं - तन्वी कोलते#tanvikolte #bigboss #bigbossmarathinewseason  #entertainment #SatyaprabhaNews
  • अनुश्री बरोबर अन्याय झाला का?
तुमचं मत काय?#biggboss #biggbossmarathi6 #SatyaprabhaNews  #anushrimane #BiggbossMarathi
  • लैंगिक शोषण प्रकरणातील भोंदू अशोक खरातला पाचव्या गुन्ह्यात 4 दिवसांची पोलीस कोठडी; उपचारांसाठी न्यायालयाचे निर्देश#AshokKharat #CrimeNews #PoliceCustody #CourtUpdate #SatyaprabhaNews
  • लोकशाहीत महिला सहभागाचा मृत्यू झाला आहे, हत्यारे विरोधी पक्ष आहेत. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री#DevendraFadnavis #indianpolitics #maharashtra #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10416
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8128
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6593
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

2002
Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026

Recent News

Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज