नांदेड दि.६ डिसेंबर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्रात, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास विद्यापीठाचे मा. कुलगुरू आदरणीय डॉ. मनोहर चासकर सर, मा. प्र-कुलगुरू आदरणीय डॉ. अशोक महाजन सर, तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे मा. प्र-कुलगुरू आदरणीय डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन सर प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मा. श्री. देवदत्त जोशी सर व श्री. शुभम स्वामी, मा. अधिसभा सदस्य श्री. युवराज पाटील, श्री. शिवाजी चांदणे, यांची यांची विशेष उपस्थिती होती. तसेच डॉ. एम. के. पाटील सर, डॉ. रवि एन. सरोदे सर, अध्यासन केंद्राच्या संचालिका डॉ. सुनिता पाटील मॅडम, राष्ट्रीय सेवा योजनेचे मा. संचालक डॉ. मारूती गायकवाड सर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम सर, श्री. रामदास पेद्देवाड सर, तसेच कर्मचारी संघटनेचे नेते श्री. काळबा हनवते सर यांच्यासह विविध अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












