तुषार कांबळे / हदगाव प्रतिनिधी | हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने बीज प्रक्रियेचे नियोजन करण्याचे आयोजन कृषी सहाय्यक कल्पना गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांनी बीज प्रजनन कसे करावे याविषयी सविस्तर माहिती देऊन प्रात्यक्षिके करून दाखवली सोबतच शेतकऱ्यांनी पीक पेरणी करते वेळेस रुंदवरून करून पीक पेरणी करून घ्यावी तसेच यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांना हुमणी अळी लागण्याची शक्यता असल्याकारणाने शेतकऱ्यांनी प्रकाश सापळा आपल्या शेतामध्ये लावणे गरजेचे आहे या प्रक्रियेमुळे हजारो किडे प्रकाशा भोवती येऊन ते मृत्यूमुखी पडतात यामुळे पिकाला धोका होण्याचे टाळता येते.
सोबतच पाणी फाउंडेशन च्या वतीने दशपर्णी अर्क योजनेची सखोल माहिती देण्यात आली यामध्ये विविध वनस्पती पासून
उदाहरणार्थ मिरची, लसूण पेस्ट, गोमूत्र, गाईचे शेण, करंजी चा पाला, निरगुडीचा पाला, रुचकी चा पाला, धोत्र्याचा पाला, लिंबाचा पाला, सीताफळाचा पाला, गुळवेलाचा पाला, एरंड्याचा पाला,आशा विविध औषधी पाल्याचा समावेश पासून दशपर्णी औषधी तयार करून पिकावर फवारता येते अशी माहिती शेतकऱ्यांना दिली..
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित कवाना गावचे सरपंच भिकाजी सूर्यवंशी सहाय्यक कृषी अधिकारी कल्पना गायकवाड सहायक कृषी अधिकारी शुभम गायकवाड पाणी फाउंडेशन अंतर्गत विक्रांत उजगरे दुर्गेश गुरनुले कृषी समूह सहाय्यक अविनाश मस्के तसेच गावातील जय जवान जय किसान शेतकरी गटाचे सर्व सदस्य व शेकडो शेतकरी उपस्थित होते
सत्यप्रभा न्यूज नांदेड





















