नांदेड दि.२७: खुपच निर्दयी घटना.
हदगाव तालुक्यातील वरवट येथील दुर्दैवी घटना. मुलीचा मृतदेह चुलती आणि पुतणी शोध सुरू.अचानक आलेल्या पुरात वाहून गेल्याचे सिद्ध.
हदगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाला असणाऱ्या वरवट येथे दिनांक २७ मे मंगळवारी दुपारी ११.४५ वाजण्याच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला तो तब्बल दीड तास चालू होता.शेतात मजुरीला गेलेल्या महिलेसोबत पाऊस आल्यामुळे घराकडे परत येत असताना नाल्याला पुर आला त्या पुरात आपली चिमुकली जात होती तिला परत आणण्याचा प्रयत्न करताना आई पुतणी वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडून आली
वरवट येथील अरुणा बळवंत शकिरगे वय 25 वर्षे या आपल्या कुटुंबाची उपजीविका भगवण्याकरिता दुसऱ्याच्या शेतात मजुरीला गेल्या होत्या अचानक पाऊस सुरू झाला गाव नजीक असल्या नाल्याला पूर आला त्या मध्ये अरुणा बळवंत शकिरागे, दुर्गा बळवंत शकिरगे वय 9 वर्षे आणि अंकिता विजय शकिरगे वय 5वर्षे या पुरात वाहून गेल्या त्यातील वृत्त लिही पर्यंत दुर्गा हीचा मृतदेह सापडला अजून दोघीचा शोध सुरू आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड