इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनचा उत्कृष्ट शाळा व उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार
ता. प्र. दत्तात्रय सज्जन
धर्माबाद दि.२८: तालुक्यातील प्रसिद्ध आणि उपक्रमशील शाळा ‘विझ्डम डिजी कॉन्सेप्ट स्कूल आणि ज्युनियर कॉलेज’, या शाळेला उत्कृष्ट शाळा पुरस्कार आणि याच शाळेचे कृतीशील प्राचार्य औसाजी चंद्रभान जाधव यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार
प्रदान करण्यात आले आहेत. हे दोन्ही पुरस्कार ‘महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन’ अर्थात MESTA या प्रतिष्ठित व अधिकृत संघटनेमार्फत राज्यस्तरीय अधिवेशनात, ठाणे (मुंबई) येथे प्रदान करण्यात आले आहेत.
या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणाऱ्या शैक्षणिक संस्थेची व व्यक्तींची निवड करताना MESTA ने काही निकष ठेवले होते, ज्यामध्ये शाळेचे कुशल व्यवस्थापन, शाळेचा अद्ययावत अभ्यासक्रम व पाठ्यक्रम व अभ्यासक्रम यांची अचूक अंमलबजावणी, अनुभवी, तज्ज्ञ व पात्र शिक्षकांची निवड, शाळेच्या प्राचार्यांचे कुशल नेतृत्व, प्रभावी अध्यापन पद्धतींचा वापर करत मागील काही वर्षांत दिलेले दहावी बोर्ड परीक्षेतील उत्तम यश, इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील यश, ऑलिम्पियाड परीक्षेतील यश, शाळेतील सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा,या व अशा अनेक बाबींचे मूल्यमापन करून या सगळ्या निकषांस पात्र ठरलेल्या विझ्डम शाळेला ‘उत्कृष्ट शाळा पुरस्कार’ आणि या शाळेच्या प्राचार्यांना ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ MESTA चे व्यवस्थापकीय अध्यक्ष डॉ.संजयराव तायेडे पाटील, तसेच MESTA चे राज्यस्तरीय पदाधिकारी यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या शाळेचे प्रतिभासंपन्न प्राचार्य औसाजी चंद्रभान जाधव यांनी मोठ्या विनम्रतेने या दोन्ही पुरस्कारांचे श्रेय त्यांच्या शाळेतील समर्पित भावनेने काम करणाऱ्या पात्र शिक्षकांना दिले आहे. अशा पुरस्करांची नवीन परंपराच या शाळेने निर्माण केल्याचे पाहायला मिळते आहे, कारण मागील शैक्षणिक वर्षात दिनांक १९ एप्रिल, 2२०२४ रोजी ‘असोसिएशन ऑफ इंग्लिश मिडीयम स्कूल’ AEMS या संघटनेतर्फे ‘विद्यारत्न-२०२४ पुरस्कार’ या पुरस्काराने शाळेच्या प्राचार्यांना सन्मानित केले आहे. यासोबतच यंदाच्या वर्षी ‘शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य’ यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा’ या राज्यस्तरीय स्पर्धेत तालुका प्रथम पुरस्कार प्राप्त झाले आहे. आणि आता ‘उत्कृष्ट शाळा पुरस्कार’ तसेच ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ याही पुरस्कारांची मानकरी विझ्डम शाळा ठरली आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड