कुंडलवाडी दि.३ संष्टेबर: वरील निर्धाराने कुंडलवाडी पोलीस स्टेशनमार्फत आयोजित बैठकीत तब्बल २८ गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनाकडे हमीपत्र सादर केले.
ही बैठक आदरणीय दशरथ पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी, धर्माबाद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यांनी सर्व मंडळांना डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे महत्त्व पटवून दिले व योग्य मार्गदर्शन केले.
बैठकीचे नियोजन व आयोजन सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे व पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर यांनी केले. यावेळी त्यांनी ‘गणराजा पुरस्कार २०२५’ या स्पर्धेबाबत सविस्तर माहिती दिली व सर्व गणेश मंडळांना भरघोस सहभाग नोंदवण्याचे आव्हान केले.
कार्यक्रमास पोलीस कर्मचारी, तसेच कुंडलवाडीतील प्रतिष्ठित नागरिक साईनाथ उत्तरवार उपस्थित होते. परीक्षक मंडळ म्हणून प्रा. डॉ. माधव हळदेकर, डॉ. नरेश बोधनकर, श्री. कल्याण गायकवाड, सायरेडी ठक्करवाड व हनमल्लू ईरलावार यांनी हजेरी लावली.
या बैठकीत कुंडलवाडीतील सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले व डीजेमुक्त, पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक काढण्याचा संकल्प व्यक्त केला.