नांदेड :पात्र शेतकऱ्यांना विविध शेती विकासाच्या योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा, पीक कर्ज, पीक विमा नुकसान भरपाई, नैसर्गिक आपत्ती काळात सुयोग्य शासकीय मदत मिळावी यासाठी ई-पीक पेरा नोंद गरजेची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपमध्ये ई-पीक पेऱ्याची अचूक नोंद करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
खरीप हंगाम 2023 साठी क्षेत्रीय स्तरावरुन पीक पाहणी (रियल टाइम क्रॉप डाटा) संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच हा डाटा/माहिती संकलन करताना पारदर्शकता आणणे, पीक नोंदणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग असणे, पतपुरवठा सुलभ करणे, पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रीया सुलभ करणे, किमान आधारभूत किंमत योजनेतर्गत विक्रीसाठी संगती देण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे, आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचुक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे या उद्देशाने शेतकऱ्यांनी त्यांच्या स्मार्ट मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी ॲप सुरु करुन त्यात पीक पाहणी नोंदवावी, असे जिल्हा प्रशासच्यावतीने कळविण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी ॲपद्वारे पीक पेरा करण्यासाठी तलाठी, कृषी सहायक , पोलीस पाटील, रोजगार सेवक, स्वस्त धान्य दुकानदार, कोतवाल, शेतीमित्र, प्रगतीशील शेतकरी, आपले सरकार केंद्र चालक, संग्राम केंद्र चालक, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, तरुण मंडळांचे प्रतिनिधी, तंत्र साक्षर स्वयंसेवकांनी ई-पीक पेरा नोंदविण्यासाठी सहकार्य करावे.
#सत्यप्रभा न्यूज #नांदेड
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!











Heya are using WordPress for your site platform? I’m new
to the blog world but I’m trying to get started and create my
own. Do you need any html coding knowledge to make
your own blog? Any help would be greatly
appreciated!