16881 रुपयांच्या मुद्दे माला सह 3 आरोपी गजाआड…
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- शहरातील बस स्टँड परिसरात दि 13 जून ते 14 जून च्या मध्य रात्री अष्टविनायक मोबाईल शॉपीचे शटर तोडून चोरी करण्यात आली होती त्याची फिर्याद स्वप्नील पि.शंकर चेलमेलवार रा. प्रतापगल्ली यांनी दिल्या नुसार मोबाईल शॉपीचे शटर कशाने तरी वाकवुन आत प्रवेश करून दुकाणातील 17897 रूपयाचे मोबाईल व टॅब चोरट्याने चोरून नेले वगैरे फिर्याद दिल्या वरून हिमायतनगर पोलीस स्थानकात गु.र.न. 128/2023 कलम 457,380 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता
सदर गुन्ह्याचा तपास येथील महिला अमलदार स.पो.उपनी के.बी. कागणे, पोहेका 1272 श्यामसुंदर नागरगोजे, पोना 895 पवन चौदंते त्यांनी मा.पो.नी. श्री भूसनुर साहेब यांचे मार्गदर्शना खाली मा. पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड येथील सायबर ब्रॅन्च यांच्या मदतीने सदर गुन्ह्यात प्रकाश उर्फ बाबु प्रल्हाद चव्हान यास चौकशी कामी ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्ह्या हा इतर तीन साथीदार यांचे मदतीने केल्याची कबुली दिली व या गुन्ह्यात गेलामाल 01 लिनोवा कंपनीचा टॅब, एक लावा कंपनीचा व एक कार्बन कंपनीचा मोबाईल असा 11781 रूपयाचा माल त्याचे कडुन हस्तगत केला. व त्यांनी सांगीतलेल्या त्याचे साथीदार राजु आनंदराव मेश्राम व दीपक जनार्धन चव्हान यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन प्रत्येकी 03 कार्बन चे मोबाईल किमंती 5100 रू.असा एकुन 16881 रू. चा मुद्देमाल हस्तगत केला असे येथील पोलीस स्टेशन पो.नी. श्री भुसनुर, मसपोउपनी के. बी. कागणे यांनी सांगितले
यावेळी या प्रकरणात पोहेका 1272 श्यामसुंदर नागरगोजे, पोना 895 पवन चौदंते यांनी चागले काम केल्या बद्दल यांचे मा. पोलीस अधिक्षक साहेब नांदेड, मा. अपर पोलीस अधिक्षक साहेब भोकर, मा.सहा.पो.अ. मँडम भोकर यांनी अभिनंदन केले आहे.