औरंगाबाद: सायंकाळपासून या प्रकरणावरून कोल्हापुरात तेढ निर्माण झालेला असून काही ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या.काही संघटनांनी यावरून कोल्हापूर बंदचीही हाक दिली. यादरम्यान हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.
त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज केला. तसंच, अश्रुधूराच्या नळकांड्याही काही ठिकाणी फोडण्यात आल्या.या प्रकरणात पोलिसांनी स्टेटस ठेवल्याच्या आरोपांवरून 6 जणांना अटक केली आहे.
“कोल्हापुरात सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, कोणीही कायदा सुव्यवस्था खराब होईल असे करू नये, कोणीही कायदा हातात घेऊ नये, कायदा हातात घेतल्यावर कारवाई होणार. कायदा हातात घेण्याचं समर्थन केलं जाणार नाही. औरंगजेबाचं उदात्तीकरण कोणीही करू नये”, असं महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे. #सत्यप्रभा न्यूज # नांदेड
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!