हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- शहरातील तहसील कार्यालय येथील वसंतराव नाईक सभागृहात दिनांक 14 सप्टेंबर रोजी शांतता कमिटीचे बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीमध्ये आगामी होणाऱ्या गणेश उत्सव व दुर्गा उत्सव कार्यक्रमात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शहरातील हिंदू मुस्लिम एकतेची परंपरा कायम राहावी यासाठी हिमायतनगर चे तहसीलदार आदित्य शेंडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज शांतता कमिटीचे बैठक घेण्यात आली होती यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनुर यांनी उपस्थित गणेश मंडळांना व लोकप्रतिनिधींना असे सांगितले की कायद्याचे पालन करून आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवत आगामी सण उत्सव काळात शांतता कायम ठेवत गणेश उत्सव साजरा करा असे आवाहन केले..

याबाबत सविस्तर वृत्त असे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिमायतनगर पोलीस स्थानकाकडून शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये गावातील प्रमुख मान्यवर व शहरातील सर्व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आले होते या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये हिमायतनगर चे तहसीलदार आदिनाथ शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून नगरपंचायतीचे मुख्याधिकारी ताडेवाड साहेब, महावितरणचे अभियंता भडंगे साहेब यांच्यासह पोलीस निरीक्षक बी. डी.भूसनुर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी सह आदिनाथ पाटील हे उपस्थित होते यावेळी उपस्थित गावकऱ्यांनी नगरपंचायतीच्या प्रभारी असलेल्या मुख्याधिकाऱ्यांना शहरात गणेश उत्सव व दुर्गा उत्सव काळात भेडसावत असलेल्या समस्येचा पाढा त्यांच्यासमोर वाचून दाखवला व गणेश उत्सव काळात नागरिकांना होत असलेल्या अनंत अडचणी त्यांच्या समोर मांडल्या त्यामुळे उपस्थित गावकऱ्यांनी नगरपंचायतीच्या व महावितरण कार्यालयाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामाबद्दल असंतुष्टता व्यक्त केली ही संतुष्टता आगामी गणेश उत्सव काळात खपऊन घेतली जाणार नाही अन्यथा शहरात एकही गणेश विसर्जन करू देणार नाही अशी सक्त सूचना माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये सांगितले त्यानंतर हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक बि.डी. भूसनूर यांनी शहरातील सर्व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना असे आव्हान केले की सण उत्सव काळात कुठलाही डी.जे. किंव्हा साऊंड सिस्टीम वाजवण्यात येणार नाही व आपण शासनाने दिलेल्या कायद्याच्या चौकटीत राहून नियमांचे पालन करत गणेश उत्सव साजरा करावा व महावितरण कार्यालयाकडून रीतसर लाईटची परवानगी घेऊन विद्युत वापरावी, मंडळाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गैरवर्तणूक आढळून आल्यास त्यां गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येईल अशी सक्त सूचना यावेळी त्यांनी उपस्थित गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना दिल्या त्यानंतर तहसीलदार शेंडे साहेब यांनी अध्यक्षीय समारोप करताना असे सांगितले की लंपी आजाराचे सावट सध्या सर्वत्र पसरले आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या गाई बैलांच्या जनावरांची काळजी घेऊन बैलपोळा हा सण घरीच साजरा करावा असे म्हणत आगामी होणाऱ्या गणेश उत्सव काळात नागरिकांना निर्माण होणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मी स्वतः लक्ष देऊन त्या अडचणी लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न करेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला…


यावेळी माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड , माजी जिल्हा परिषद सदस्य समद खान ,माजी उपनगराध्यक्ष मोहमद जावेद गणि, नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गजानन तुप्तेवार,आशिष सकवान, तालुका अध्यक्ष गजानन चायल , शिवसेना तालुकाप्रमुख विलास वानखेडे , शिवसेना शहराध्यक्ष प्रकाश रामदिनवार, राम नरवाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सरदार खान पठाण, राष्ट्रवादी शहराध्यक्ष उदय देशपांडे,काँग्रेस शहर अध्यक्ष संजय माने, काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण, माझी तंटामुक्ती अध्यक्ष अनवर खान पठाण, गजानन हारडपकर, संदीप तुप्तेवार,बाकी सेठ ,पंडित ढोणे,सय्यद मन्नान,मंगेश धुमाळे,प्रवीण कोमावार सह शहरातील गणेश मंडळाचे कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते