हदगाव प्रतिनिधी : एस.एम.निवासी संमिश्र अपंग तांत्रिक प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्र बरडशेवाळा येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त कार्यशाळेतील शिक्षक संतोष लंगडे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जिवनकार्याविषयी माहिती देऊन मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी कार्यशाळेतील कर्मचारी दत्ता उपवाड,बाळू आठवले,चक्रधर इंगोले,श्रीमती मुद्रिका सोनकांबळे,श्रीमती वनिता भिसे,संजय लोमटे, बापुराव चव्हाण यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.प्रास्ताविक कार्यशाळेचे लिपीक अक्षय कांबळे यांनी केले. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!