हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- हदगाव हिमायतनगर तालुक्याचे विधानसभा संपर्कप्रमुख सचिन साहेबराव चराटे पाटील यांनी आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित साधून हिमायतनगर येथील शासकीय विश्रामगृह येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन महाराष्ट्रात भाजपा सरकारने खोटारडेपणाचा जो कळस गाठला आहे त्याचे उदाहरण देऊन तालुक्यातील खेड्यापाड्यातील व वाडी तांद्यातील वस्तीपर्यंत जाऊन या भाजपाच्या खोटारडेपणाचा पाढा जनतेसमोर मांडणार असल्याचे सचिन चराटे पाटील यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले..

महाराष्ट्रातील भाजपा सरकार हे शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत कुंभकर्णी झोपेत असल्यामुळे या सरकारचा कडाडून निषेध करत सचिन चराटे पाटील यांनी आगामी काळात हदगाव हिमायतनगर तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एक ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर या सप्ताहात “होऊ दे चर्चा ” हे अभियान अधिक व्यापक करून प्रत्येक नागरिकापर्यंत भाजपाच्या खोटारडेपणाचा पाढा जनतेसमोर दाखवून द्यायचा आहे या मोहिमेची सुरुवात आज दि 17 सप्टेंबर रोजी हिमायतनगर शहरात करण्यात आली तेव्हा सचिन चराटे पाटील यांनी असे सांगितले की आगामी काळात रबिविण्यात येणाऱ्या होऊ दे चर्चा या बैठकीचा प्रथम टप्पा आज पासून सुरू करण्यात आला आहे त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक हे वाडी तांड्यात जाऊन भाजपा सरकार ने जे नागरिकांना खोटे आश्वासन दिले होते त्यामध्ये दोन करोड नागरिकांना नोकरी देऊ असे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली याची पडताळणी करून त्यांचा खोटारडे पना पुन्हा उघड करत शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या व शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास परावर्त करणाऱ्या भाजपा सरकारच्या विरोधात होऊ दे चर्चा अभियान अधिक व्यापक करून प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शिवसैनिकांनी तयार राहण्याचे आव्हान केले व लवकरच हिमायतनगर येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना तालुका प्रमुखांची निवड होणार आहे त्यासाठी संजय काईतवाड , विठल ठाकरे,विलास वानखेडे,संतोष पुलेवार,श्रीराम माने पाटील व कृष्णा पाटील यांनी मुलाखती दिल्या त्यामुळे आता लवकरच तालुका प्रमुख जाहीर होणार असल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी बोलताना सांगितले

यावेळी नगराध्यक्ष कुणाल राठोड, शिवसेना उपतालुका प्रमुख विलास वानखेडे, तालुका संघटक संजय काईतवाड, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष जफरला लाला,ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे,गणेश पाळजकर,संतोष पुलेवार,श्रीराम माने,सोहेल खान,प्रल्हाद पाटील,सवान डाके,लक्ष्मण डांगे,प्रकाश रामदीनवार,राम नरवाडे,राम गुंडेकर, कृष्णा पाटील,गणेश राहुलवाड,गुलाब राठोड,अवधूत वानखेडे,शाहीर वानखेडे सह आदी शिवसैनिक उपस्थित होते