हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- शहरातील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत देशपांडे यांचा वाढदिवस आज दि 17 जुलै रोजी शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वही पेन व दप्तर व चॉकलेट देऊन त्यांच्या मित्र परिवारानी मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा केला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की लक्ष्मीकांत देशपांडे यांच्या मित्र परिवाराने आज दि 17 जुलै रोजी एक समाजापुढे आदर्श ठेवत इतरांन सारखा वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून त्यांनी शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील 465 विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत वही, पेन, दप्तर व चॉकलेट देऊन त्यांचा वाढदिवस मोठ्या आनंदात व हर्ष उल्हासात साजरा केला व समाजात अनोखा संदेश यातून दिला लक्ष्मीकांत देशपांडे यांना मानणारा शहरात मोठा वर्ग आहे ते नेहमी गरिबांच्या व वंचितांच्या मदतीला धाऊन जात असतात आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक यांनी शाळेच्या प्रांगणात बसवण्यात येत असलेल्या प्युअर ब्लॉकच्या गट्टूसाठी त्यांच्याकडे समस्या मांडली इतर मदत करणाऱ्या दात्या प्रमाणे त्यांनी आज वाढदिवसाच्या दिवशी शाळेच्या प्रांगणात बसवण्यात येत असलेल्या प्युअर ब्लॉक च्या गट्टू बांधकामासाठी पाच हजार रुपये नगदी रोख देऊन शाळेस सरळ हाताने मदत केली त्यामुळे त्यांच्या या कौतुकास्पद कार्याचे येथील शिक्षक व पालकांनी त्यांचे स्वागत करून त्यांना वाढदिवसाच्या भर भरून शुभेच्छा दिल्या

यावेळी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एस.एस.संगमनेर,शिक्षक चव्हाण सर, संभाजी कदम सर,पैल वाड सर,हेमाताई रायेवार मॅडम, हंनवते सर,बनसोडे सर, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यश गणेश पाळजकर,किरण माने,अरविंद वानखेडे, प्रदीप नरहारे,श्रीकांत थोटे,श्रीनिवास जाधव,गजानन हरणे,परमेश्वर सुरजवाड,संदीप दळवी सह पत्रकार नागेश शिंदे,अनिल नाईक व मिञ परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते