
👉🏻शाळेचा परिसर व विद्यार्थी पाहून समाधान व्यक्त…

हिमायतनगर प्रतिनिधी /- शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेस दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी शुक्रवारी माननीय न्यायाधीश गाडगे यांच्या पथकाने शहरातील जिल्हा परिषद शाळेस अचानक भेट दिली आणि शाळा परिसर व येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा अहवाल तपासला असता जिल्हा परिषद शाळा अशा पण असतात का ? असे म्हणून त्यांनी येथील शिक्षकांचे व मुख्याध्यापकांचे अभिनंदन करत समाधान व्यक्त केले.
यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार मॅडम, सहाययक पोलिस निरीक्षक आदिनाथ पाटील, गटशिक्षणाधिकारी, बांधकाम अभियंता श्री डांगे यांसह त्यांच्या पथकातील संपूर्ण सदस्य उपस्थित होते या पथकाने जिल्हा परिषद शाळेच्या परिसराची पाहणी केली तेव्हा शाळा परिसरात स्वच्छता, स्वच्छतागृह, शाळेचे रंगरंगोटी, डिजिटल वर्ग खोल्या, शालेय वाचनालय, शालेय पोषण आहार, पिण्याचे RO फिल्टर पाणी ह्या सर्व सोई सुविधा विद्यार्थ्यांना प्राप्त असल्याचे पाहून येथील सर्व वर्गातील चालू स्थितीतील टी.व्ही. प्रोजेक्टर, पंखे, कुलर, पाण्याची व्यवस्था, शालेय बँड पथक यांची सुद्धा त्यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले.शाळेतील प्रत्येक वर्गातील शिस्त आणि बोलके विद्यार्थी आणि सुंदर व स्वच्छ शाळेचा परिसर पाहून न्यायाधीशांनी व SDM मॅडम यांना येथील मुख्याध्यापक श्री. संगमनोर सर व शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गणेश पाळजकर,किरण माने यांचे अभिनंदन केले त्याबरोबर शाळेतील सर्व शिक्षकांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
यावेळी आदरणीय न्यायाधीश श्री गाडगे, एस.डी.एम.अरूणा संगेवार मॅडम यांच्या हस्ते शाळेच्या प्रगणात वृक्षारोपण करण्यात आले व शाळेतील सर्व शिक्षकांची एकजूट, कर्तव्यनिष्ठ काम करण्याची विशेष शैली पाहून शाळा तपासणी साठी आलेल्या पथकाने समाधान व्यक्त केले.