हिमायतनगर प्रतिनिधी/- शहरातील बाजार चौक येथील पशू वैद्यकीय रुग्णालय परिसरातील अंगणवाडी क्रमांक सहा शाळेत आज दि 15 जून रोजी बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प क्रमांक तीन नांदेड च्या वतीने मान्सून पूर्व तयार कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनुसया जोगदंड मॅडम सह प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार नागेश शिंदे सह संदिप उमरे उपस्थीती होते

यावेळी शाळेच्या पहिल्या दिवशी अंगणवाडी मध्ये आलेल्या वयोगट तीन ते सहा मधील विद्यार्थ्यांचे अंगणवाडी सेविका छाया संदीप उमरे सह मंजुषा हळदे यांनी पुष्पगुच्छ व खाऊ देऊन स्वागत केले यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांच्या पाल्यांना मान्सून पूर्व तयारी कार्यक्रम घेऊन गरोदर माता, स्तन माता व वयोगट तीन ते सहा वर्ष बालकांचे कसे संगोपन करावे अशा विविध विषयावर उपस्थित असलेल्या विद्यार्थांच्या पाल्यांना अंगणवाडी सेविका छाया संदीप उबरे त्यांनी मार्गदर्शन केले यावेळी मंजुषा गंगाधर हाळदे नगरपंचायतीचे मुकदम संदीप आत्माराम उमरे, भुजंग बनसोडे, बंडू गायकवाड, विठ्ठल भुरुकुटवाड सह दिलीप सोनसळे उपस्थित होते