बोधी कदम यांचे समाज बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन…
तुषार कांबळे ! हदगाव प्रतिनिधी | त्यागमूर्ती माता रमाई व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या घोषणांनी भारलेले वातावरण निर्माण करत, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आठवी राज्यस्तरीय रमाई बौद्ध धम्म परिषद मंगळवार, दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी तालुक्यातील चिकाळा येथे आयोजित करण्यात आली आहे. या धम्म परिषदेला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले असून, क्रांतीभूमी हदगावच्या इतिहासात प्रथमच डॉ. बाबासाहेब आआंबेडकर यांचे पणतू आणि रिपब्लिकन सेनेचे युवा नेते अॅड. अमनसाहेब आंबेडकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष सुनील भाऊ हरिहरराव सोनुले राहणार
असून, उद्घाटक म्हणून हटगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर उपस्थित राहतील. स्वागताध्यक्ष म्हणून प्रसिद्ध विचारवंत व विधीतज्ञ अॅड. डी. एफ. हरदडकर
यांची भूमिका असेल. यावेळी विशेष सत्कारमूर्ती म्हणून प्रभू सावंत (राज्य उपाध्यक्ष, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक सघ) याचा सन्मान करण्यात येणार आहे. दीपप्रज्वलनाचा मान जिल्हा परिषद नांदेडच्या माजी सभापती अनिताताई हिंगोले याना मिळणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. गौतम मोरे (संयोजक, सत्याग्रह फोरम, मुंबई) मार्गदर्शन करणार आहेत. तसेच भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष
दादासाहेब शेळके, रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण भाऊ घोंगडे, मराठवाडा नेते माधव दादा जमदाडे, प्रदेशाध्यक्ष दिनेश हनुमंत, जिल्हाध्यक्ष अनिल शिरसे, तसेच विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय अभय दादा वाठोरे, प्रशांत दादा इंगोले (गटनेते, मनपा नांदेड), आकाश भाऊ जोंधळे (नगरसेवक), प्रशांत भाऊ गोडबोले, मुन्ना भाऊ वाठोरे, समाधान भाऊ डोगरदिवे, इंजिनिअर कानींदे सर, गौतम कदम सर, शंकर थोरात, अॅड. नामदेव सावंत (हायकोर्ट, छत्रपती संभाजीनगर), एम. एम. परघणे, सुधीर भाऊ साळवे (सह्याद्री फाउंडेशन, परभणी) व मंगेश भाऊ उबाळे आदी मान्यवर
उपस्थित राहणार आहेत. धम्म परिषदेचे निमंत्रक म्हणून दीपक दादा ओमकार (गोल्डमॅन, किनवट) कार्यरत असून, विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात बुद्ध-भीम गीतांची मेजवानी देखील लाभणार असून, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक उमेश बागडे (नागपूर) व सुप्रसिद्ध गायिका निशाताई धोंगडे (चंद्रपूर) आपली कला सादर करणार आहेत. या ऐतिहासिक धम्म परिषदेला तालुका, जिल्हा व राज्यभरातील बौद्ध उपासक-उपासिका तसेच आआंबेडकरी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन आयोजक बोधीवृक्ष कदम यांनी केले आहे.
सत्यप्रभा न्यूज नांदेड