• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Saturday, May 9, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

खुलेआम भोंदूगिरी करणाऱ्या बाबांची यादी अंनिस पोलिसांना देणार.

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
24 March 2026
in Top News, महाराष्ट्र
image editor output image562855037 1774325584303
33
SHARES
221
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.२४ मार्च: ज्योतिषी- बाबा-बुवा आणि राजकारणी-सरकारी अधिकारी-धनदांडग्या प्रभावशाली व्यक्ती यांची साठगाठ किती भयानक शोषणकारी असते याचे हादरवून टाकणारे चित्र ज्योतिषी अशोक खरातच्या प्रकरणातून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या समोर आले आहे.

या प्रकरणाचा निःपक्षपाती तपास होऊन गुन्हेगारांना शासन झालेच पाहिजे तसेच पुन्हा असे प्रकार घडू नयेत यासाठी पुढील मुद्द्यांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सदर प्रेसनोटमध्ये करण्यात आली आहे.

भोंदूबाबांची यादी
सामान्य नागरिक व पीडित व्यक्ती या बुवा बाबांकडून होणाऱ्या शोषणासंदर्भात अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क साधत असतात. प्रत्येक जिल्ह्यातील अशा प्रमुख शोषणकारी भोंदू बाबांची यादी व शक्य असेल तेथे यासंदर्भातील पुरावे असलेला पेन ड्राईव्ह अंनिसचे कार्यकर्ते जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या सुपूर्त करणार आहेत. अंनिसच्या राज्य कार्यकारी समितीचे सदस्य मुक्ता दाभोलकर, राजीव देशपांडे, गणेश चिंचोले यांनी आज दिनांक 23 मार्च रोजी महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक श्री सदानंद दाते यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भातील निवेदन दिले.

प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्षाची स्थापना करण्याचा शासन निर्णय आहे. हे अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष प्रत्यक्ष कार्यान्वित करणे आवश्यक आहे. पत्रकार, महिला, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्त्यांना सदर अंधश्रद्धा निर्मूलन कक्षाचे सदस्य म्हणून जोडून घेऊन त्यांच्या नियमित बैठका झाल्या तर परिसरात चालणारे अघोरी प्रकार वेळीच समोर येतील व त्यांना पायाबंद घालता येईल. त्यासाठी फक्त कागदावर असलेले हे अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष कार्यान्वित झालेच पाहिजेत अशी मागणी या प्रेसनोटमध्ये करण्यात आलेली आहे. मा. पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या भेटीदरम्यान याबद्दलचे निवेदन देखील त्यांना देण्यात आले.

भोंदूबाबांसंदर्भात हेल्पलाईन
आपापल्या परिसरातील भोंदू बाबांबद्दल माहिती देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती एक हेल्पलाइन नंबर सुरू करत आहे. त्या त्या भागातील अंनिस कार्यकर्ते याद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारींचे तथ्य तपासून वेळोवेळी त्यांची यादी पोलिसांना देणार आहेत.

जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम तयार करण्याची मागणी
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या बलिदानानंतर 2013 साली जादूटोणा विरोधी कायदा मंजूर झाला. याला एक तप उलटून गेले तरीही शासनाने या कायद्याचे नियम तयार केलेले नाहीत. जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम तयार करून सदर कायद्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया आणि त्यासंदर्भातील पोलिसांची जबाबदारी शासनाने अधिक सुस्पष्ट केली पाहिजे. लोकांच्या मनात भीती उत्पन्न करून त्यांना अघोरी कृत्ये करायला लावणारे अशोक खरात सारखे ज्योतिषी, बाबा, बुवा, मांत्रिक गावोगावी आहेत. ते अशोक खरात एवढे दांडगे बनण्याची वाट न पाहता वेळीच पोलिस हस्तक्षेप करून त्यांच्या प्रभावाला पायबंद घालण्यासाठी या कायद्याचे नियम तयार झालेच पाहिजेत. सदर नियमांचा प्रस्तावित मसुदा महाराष्ट्र अंनिसने याआधी शासनाला सादर केलेला होता परंतु लवकरच पुन्हा एकदा अंनिसच्या वतीने या नियमांचा मसुदा सामाजिक न्याय विभागाला सादर करण्यात येईल.

सोशल मीडियातून होणाऱ्या अंधश्रद्धा प्रसाराला अटकाव:
सोशल मीडियातून बाबा- बुवा, ज्योतिषी, मंत्र-तंत्र यांच्या रील्सचा लोकांवर अक्षरशः भडिमार होत आहे. औरंगाबाद खंडपीठाच्या या संदर्भातील निर्णयाला अनुसरून शासनाने अंधश्रद्धा पसरवणाऱ्या जाहिरातींचे नियमन करणारी स्वतंत्र यंत्रणा तातडीने तयार करायला हवी अशी मागणी या प्रेसनोटमध्ये करण्यात आली आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने या सर्व मागण्यांची मांडणी करणारे पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना देखील पाठवण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यकारी समिती सदस्य नंदिनी जाधव, मुक्ता दाभोलकर, नीता सामंत, मिलिंद देशमुख, राहुल थोरात, हमीद दाभोलकर, राजीव देशपांडे, फारुख गवंडी, सम्राट हटकर यांच्या वतीने देण्यात आली.

Previous Post

रुपाली चाकणकरांचे प्रदेशाध्यक्षपदही गमावणार?

Next Post

‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’चा धडाका! हिमायतनगर पोलिसांची पोटा बु. येथे मोठी कारवाई; ४ लाख ८८ हजारांचा गुटखा जप्त

Next Post
Himayatnagar News

'ऑपरेशन फ्लॅश आऊट'चा धडाका! हिमायतनगर पोलिसांची पोटा बु. येथे मोठी कारवाई; ४ लाख ८८ हजारांचा गुटखा जप्त

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • मुलींनी पुन्हा मैदान मारलं! दहावीचा निकाल जाहीर यंदाही मुलींची बाजी!
.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला असून, यंदाही मुलींनी मुलांवर मात करत बाजी मारली आहे. एकूण परीक्षेला बसलेल्या मुलींपैकी ९४.९६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८९.५६ टक्के इतके आहे. गेल्या काही वर्षांतील परंपरेप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आणि विशेषतः बाजी मारणाऱ्या मुलींचे सर्वत्र कौतुक होत आहे.
.. #SatyaprabhaNews  #SSC #SSCResult2026 #Result #10thExam SSCResult
  • दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा दहावीचा निकाल 92.09 टक्के #Result #10thExam #Maharashtra #SSCResult #SatyaprabhaNews  LatestNews (SSC Result, 10th Exam Result, Maharashtra SSC
  • Shashikant Shinde | पेरॉल देण्यापेक्षा महिन्याभरातच फाशी द्या! | Satyaprabha News
.
#shashikantshinde #ncp #sharadpawar #SatyaprabhaNews #nasrapurcase punecase childabuse posco punepolice
  • Ambadas Danve | फिनिक्स पक्षासारखी राखेतून भरारी घेऊ | Satyaprabha News
.
#ambadasdanve #shivsenaubt #SatyaprabhaNews #sambhajinagar #vidhanparishad
  • Raju Shetty | राजू शेट्टींची सरकारवर जहरी टीका | SatyaprabhaNews#rajushetty #farmersprotest #ustodkamgar #SatyaprabhaNews
  • Satej Patil : सत्तेतले एवढे प्रबळ नेते असताना प्रशासक येतो कसा? : सतेज पाटील
.
#kolhapur #sangli #congress  #SatyaprabhaNews  #satejpatil gokuldudhsangh
  • Samarjit Gatage | गोकुळच्या प्रश्नांवर काही बोलणार नाही; समरजित घाटगे नेमकं काय म्हणाले? | Satyaprabha News#samarjitgatage #hasanmushrif #mahayuti #gokuldudhmahasangh #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • Nilam Gorhe | आरोपीला मदत करणाऱ्यांवरही कडक कारवाई होणार : नीलम गोऱ्हे | Satyaprabha News#nilamgorhe #vidhansabha #parvati #punecase #SatyaprabhaNews parvatipune punenews punenewsupdate
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10431
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8163
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

5614
Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
IMG 20260501 WA0538

तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..

1 May 2026
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026

Recent News

Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
IMG 20260501 WA0538

तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..

1 May 2026
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज