छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी | विजय पाटील | दौलताबाद (Daulatabad) कमानीसाठी पर्यायी बायपास नियोजित असून, हा ४ कि.मी.चा रस्ता असणार आहे. त्यासाठी ४८ एकर जमीन संपादित केली जाणार असून, जमिनीची मोजणी भूमी अभिलेख कार्यालयाने केली आहे. ४५ शेतकऱ्यांची जमीन संपादित केली जाणार आहे.
अब्दीमंडी ते दौलताबाद कमान असा मार्ग असणार आहे. १४ ठेकेदारांनी टेंडर भरले असून, टेंडर प्रक्रिया पुढील महिनाभरात पूर्ण होऊन ठेकेदार निश्चित केला जाईल. या रस्त्यावरून पर्यटक, भाविक छत्रपती संभाजीनगरहून वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर, गौताळा, म्हैसमाळ, खुलताबाद येथील भद्रा मारुतीच्या दर्शनाला जात असतात. अडीच लाखपेक्षा अधिक वाहने रोज येजा करतात. दरम्यान, नगर नाका ते दौलताबाद टी पॉइंट असा साडेआठ कि.मी.चा रस्ताही करण्यात येणार आहे. मात्र टेंडर प्रक्रियेविरोधात दोन कंत्राटदार कोर्टात गेल्याने या रस्त्यासाठी आलेला २०० कोटी रुपयांचा निधी पडून आहे.