• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Monday, April 13, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

प्रभाग क्रमांक १६ मध्ये भाजप पॅनलची भक्कम आघाडी; २० वर्षांचा अनुभव, १० वर्षांची कामगिरी आणि जनतेचा विश्वास एकवटला

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
12 January 2026
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image1642456612 1768234419936
42
SHARES
277
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.१२ जानेवारी:  नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असताना, प्रभाग क्रमांक १६ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मिळणारा प्रचंड जनसमर्थनाचा ओघ लक्षवेधी ठरत आहे. प्रचाराच्या सुरुवातीपासूनच भाजपच्या चारही अधिकृत उमेदवारांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, त्यामुळे विरोधकांच्या गोटात अस्वस्थता आणि निराशेचे वातावरण पसरल्याचे चित्र आहे.

प्रभागातील प्रत्येक गल्लीत, वसाहतीत आणि चौकात भाजप पॅनलला मिळणारे स्वागत हे ‘काम बोलते’ याची प्रचिती देणारे आहे. माजी नगरसेवक दीपकसिंह रावत यांची गेल्या २० वर्षांची अखंड राजकीय कारकीर्द ही विकासकामे, लोकहित आणि सातत्यपूर्ण जनसेवेचा विश्वासार्ह दाखला मानली जाते. त्यांच्या कार्यकाळात रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा, तसेच मूलभूत प्रश्नांवर प्रभावीपणे काम झाले असून, आजही नागरिक त्यांच्या कार्याची सकारात्मक आठवण व्यक्त करत आहेत.

त्याचबरोबर तुलजाराम यादव यांनी गेल्या १० वर्षांत प्रभागासाठी केलेली ठोस विकासकामे आणि सामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात धावून जाण्याची भूमिका त्यांना मतदारांच्या मनात वेगळे स्थान देणारी ठरली आहे. यादव परिवार हा प्रभागातील नागरिकांसाठी केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक आणि भावनिक आधार म्हणून ओळखला जात असून, अडचणीच्या प्रत्येक प्रसंगी हा परिवार लोकांच्या पाठीशी उभा राहिल्याचा अनुभव नागरिक मोकळेपणाने सांगत आहेत.

माजी नगरसेवक भारतीयाजी (भारतीया) यांचे प्रभागातील जुने, घट्ट आणि विश्वासाचे संबंध आजही भाजप पॅनलसाठी मोठे भांडवल ठरत आहेत. नागरिकांशी असलेला त्यांचा जिव्हाळा आणि दीर्घकाळ टिकलेला संपर्क हा या पॅनलच्या ताकदीत भर घालणारा घटक मानला जात आहे.

यासोबतच बजरंग ठाकूर यांनी भारतीय जनता पार्टी व संघटनेत केलेल्या अतुलनीय संघटनात्मक कार्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. बूथ स्तरापासून प्रभाग पातळीपर्यंत संघटन मजबूत करत त्यांनी पक्षाच्या प्रचाराला वेग दिला असून, याचा थेट फायदा भाजप पॅनलला मिळत असल्याचे दिसून येत आहे.

दीपकसिंह रावत, तुलजाराम यादव, अमृता ठाकूर आणि ऋची भारतीया हे उमेदवार केवळ आश्वासनांवर नव्हे, तर केलेल्या विकासकामांच्या, पारदर्शक कारभाराच्या आणि सातत्यपूर्ण जनसंपर्काच्या बळावर मतदारांसमोर उभे आहेत. मोठे संयुक्त कुटुंब, व्यावसायिक विश्वासार्हता, सामाजिक बांधिलकी आणि यादव मित्र परिवाराचा ठाम पाठिंबा या सर्व घटकांमुळे या पॅनलकडे नांदेड शहरातील सर्वांत मजबूत, संघटित आणि विश्वासार्ह पॅनल म्हणून पाहिले जात आहे.

सध्याच्या राजकीय चित्रावरून प्रभाग क्रमांक १६ मध्ये भाजप पॅनल स्पष्ट आघाडीवर असल्याचे जाणवत असून, मोठ्या मताधिक्याने विजय मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, भाजपच्या वाढत्या जनसमर्थनामुळे शिवसेना उमेदवारांसह विरोधकांमध्ये चिंता आणि निराशेचे वातावरण निर्माण झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक १६ मध्ये भाजप पॅनलला मिळणाऱ्या वाढत्या जनसमर्थनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वानेही या प्रभागाकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. आदरणीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण, मा. राजेंद्र कौडगे, खासदार डॉ. अजित गोपछडे, महानगराध्यक्ष अमर राजूरकर, डॉ. संतूकराव हंबर्डे, चैतन्यबापू देशमुख, दिलीप कंदकुर्ते, दिलीप ठाकूर आदी भाजप पदाधिकाऱ्यांनी या प्रभागात वैयक्तिक लक्ष घालून प्रचार यंत्रणा अधिक गतिमान केली आहे. या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि संघटनात्मक ताकदीमुळे प्रभाग क्रमांक १६ मध्ये रिकॉर्डब्रेक मताधिक्य मिळविण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत.

वरिष्ठ नेत्यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत भाजपचे चारही उमेदवार — दीपकसिंह रावत, तुलजाराम यादव, अमृता ठाकूर आणि ऋची भारतीया — यांनी ‘आमच्यावर दाखविलेल्या विश्वासाला निश्चितच सार्थ ठरवू’ असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. विकासकामे, पारदर्शक कारभार आणि लोकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने झटत राहण्याचा शब्द देत, मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून पक्ष नेतृत्वाचा विश्वास अबाधित ठेवण्याचा आत्मविश्वास उमेदवारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

बुद्धाची करुणामय नैतिकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन व्हिजनचा आधार : डॉ. सुखदेव थोरात

Next Post

माजी मुख्यमंत्री, खा.अशोकराव चव्हाण यांचे अभिवचन, बोरबन परिसरात प्रभाग १६ आणि १७ च्या उमेदवारासाठी झाली बैठक

Next Post
image editor output image1765998205 1768317479328

माजी मुख्यमंत्री, खा.अशोकराव चव्हाण यांचे अभिवचन, बोरबन परिसरात प्रभाग १६ आणि १७ च्या उमेदवारासाठी झाली बैठक

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • भारतात पहिल्यांदाच 9 पोलिसांना एकाचवेळी फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. तामिळनाडूतील मदुराई जिल्ह्यातील एका न्यायालयाने नऊ पोलिसांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. लॉकडाऊनमध्ये वडील आणि मुलाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. या प्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही घटना सहा वर्षांपूर्वी घडली होती.लॉकडाऊनमध्ये वडील आणि मुलाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. 2020 मध्ये तुतीकुडी जिल्ह्यातील साथनकुलम पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला होता. पी. जयराज (वय 51 वर्षे) आणि त्यांचा ३१ वर्षीय मुलगा जे. बेनिक्स यांना 19 जून रोजी कोविड-19 लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. जयराज हे मोबाईल दुकानाचे मालक आहे. परवानगी दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान उघडे ठेवल्याचा आरोप करत त्यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली होती. हा आरोप नंतर खोटा सिद्ध झाला. पोलिसांनी त्यांना साथनकुलम पोलीस ठाण्यात नेले आणि चौकशीच्या नावाखाली रात्रभर त्यांचा निर्घृणपणे छळ केला. नातेवाईकांनी आरोप केला की, त्यांना काठ्यांनी मारहाण करण्यात आली, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले.एका महिला कॉन्स्टेबलची साक्ष या प्रकरमात महत्वाचा पुरावा ठरली. पोलीस स्टेशनच्या टेबलावर आणि काठ्यांवर रक्ताचे डाग आढळले होते. नंतर दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, परंतु काही दिवसांतच जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे देशभरात पोलीस क्रूरतेविरोधात तीव्र संताप उसळला. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला राज्य सीआयडीने केला होता, परंतु मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सीबीआयने तपास हाती घेतला. सीबीआयने एका इन्स्पेक्टर, दोन सब-इन्स्पेक्टर आणि अनेक कॉन्स्टेबल्ससह 10 पोलिसांना अटक केली होती.पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नआरोपींवर खून, कट रचणे आणि पुरावा नष्ट करणे यांसारखे गंभीर आरोप ठेवण्यात आले. तपासा दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज देखील हटवण्यात आले. यामुळे  सत्य लपवण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. तपासादरम्यान आरोपींपैकी एका पोलिस उपनिरीक्षकाचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला. सहा वर्षांनंतर, 2026 मध्ये, मदुराई न्यायालयाने खटल्याची सुनावणी पूर्ण केली. मार्च 2026 मध्ये, सर्व नऊ पोलिसांना खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले.हा मृत्यू नैसर्गिक मृत्यू असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळला. मात्र, हा मृत्यू नैसर्गिक नसून मारहाणीत मृत्यू झाला हे सिद्ध झाले. 6 एप्रिल 2026 रोजी, मदुराई येथील प्रथम अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाल
  • बिग बॉस 6 सीजनमध्ये आपला पाठिंबा कोणाला आहे?#SatyaprabhaNews #MarathiNews #rakeshbapat #anushreemane #EntertainmentNews bigbossmarathi
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • गानसम्राज्ञी आशा भोसले यांच्या दुःखद निधनाने गेल्या चार पिढ्यांची मने संगीताच्या बहरात चिंबचिंब करणारा, आणि मनामनांना एका चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला आहे. आशाताईंचा स्वर कानावर पडला नाही, असा दिवस गेल्या अनेक दशकांत उजाडला नाही, आणि मावळलाही नाही. या स्वराने असंख्य क्षण फुलविले, आणि फुलवत शकुनाच्या मेंदीने रंगलेले जगण्याचे असंख्य क्षण हसविलेदेखील. आशाताई ऐहिकदृष्ट्या आपल्यात नाहीत ही जाणीव पचविणे अवघड आहे, पण त्या स्वरांची सोबत मात्र कायम राहणार आहे. कारण या स्वरांचा साज कालातीत आहे. अनेक वेळा आशाताईंनी भेटण्याचे भाग्य मला लाभले, ते अविस्मरणीय क्षण कायमस्वरूपी माझ्या मनात अजरामर राहतील. -एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री#EknathShinde #ashabhosle #singer #SatyaprabhaNews
  • ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. 12 एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मल्टी ऑरगन फेल झाल्यामुळे त्यांचे निधन झाले आहे. 11 एप्रिल 2025 रोजी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.#SatyaprabhaNews #AshaBhosale #MarathiNews
  • अजितदादा सहावेळा उपमुख्यमंत्री झाले. भविष्यात सुनेत्रा पवार यांनी अजितदादांचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण करावे. सुनेत्रावाहिनींनी मुख्यमंत्री व्हावं. -आदिती तटकरे, मंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या#AditiTatkare  #sunetrapawar  #AjitPawar #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10400
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8127
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6582
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

1208
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026
image editor output image515943228 1775235491127

खंडाळा देवी येथे हनुमान जयंतीनिमित्त पारंपरिक सोंगांचे आयोजन; उत्साहात साजरा झाला उत्सव

3 April 2026

Recent News

IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026
image editor output image515943228 1775235491127

खंडाळा देवी येथे हनुमान जयंतीनिमित्त पारंपरिक सोंगांचे आयोजन; उत्साहात साजरा झाला उत्सव

3 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज