• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Thursday, May 14, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

बुद्धाची करुणामय नैतिकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन व्हिजनचा आधार : डॉ. सुखदेव थोरात

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
11 January 2026
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image1508756288 1768141054751
32
SHARES
215
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

“कल्चरल”ची फुले-शाहू -आंबेडकर- अण्णाभाऊ साठे व्याख्यानमाला – पहिले पुष्प

नांदेड दि.११ जानेवारी: “बुद्धाची करुणामय, मानवतावादी आणि विवेकाधिष्ठित नैतिकता हाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन व्हिजनचा कणा आहे,” असे ठाम प्रतिपादन सुप्रसिद्ध विचारवंत व विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी केले. कल्चरल असोसिएशनच्या वतीने आयोजित फुले–शाहू–आंबेडकर–अण्णाभाऊ साठे व्याख्यानमालेत “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील रिपब्लिकन व्हिजन” या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विठ्ठल खाडे हे होते.
यावेळी मंचावर पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एस. पी. गायकवाड, अपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, भदन्त विनय बोधीप्रिय महाथेरो, किशोर खांडेकर, डॉ. गौतम कांबळे, संजय शेंडे, विमल नवसागरे, कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गोणारकर, सचिव डॉ. विजयकुमार माहुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. थोरात म्हणाले की, बाबासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या पक्ष व संघटना जर बाबासाहेबांचे विचार प्रमाण मानत असतील, तर एकाच विचारधारेवर आधारित इतक्या वेगवेगळ्या संघटना का निर्माण झाल्या, हा गंभीर प्रश्न आहे. बाबासाहेबांचे विचारांचे वेगवेगळे आकलन मांडल्या जातो त्यातूनही घडले. असे सांगून विषमतेला कारणीभूत असलेली जात ही केवळ सामाजिक रचना नसून ती एक सुसंगत विचारधारा व तत्त्वज्ञान आहे. जातीचा विचार हा भेद, श्रेणीक्रम आणि वर्चस्वावर आधारलेला असून इतिहासकाळापासून विषमता, शोषण आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष सुरू आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विषमतेच्या मुळावर घाव घालण्यासाठी सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक अशा सर्व पातळ्यांवर समतेची रचना उभी करण्याचा विचार मांडला. सामाजिक जीवनात स्वातंत्र्य, समता व बंधुता राजकीय व्यवस्थेत संसदीय लोकशाही, आर्थिक पातळीवर राज्य समाजवाद आणि सांस्कृतिक जीवनात बुद्धाची करुणामय नैतिकता—या चार आधारांवर बाबासाहेबांचे रिपब्लिकन व्हिजन उभे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकशाहीवर नितांत प्रेम असलेल्या बाबासाहेबांना भारतातील विविध धर्म, भाषा व जातींनी विभागलेले सामाजिक वास्तव पूर्णपणे ज्ञात होते. त्यामुळेच इंग्लंडसारख्या राजकीय बहुसंख्याकतेऐवजी भारतात कम्युनल किंवा जातीय बहुसंख्याकतेचा धोका अधिक असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. अशा बहुसंख्याकवादात अल्पसंख्याकांचे हक्क दडपले जाऊ शकतात, ही बाबासाहेबांची गंभीर चिंता होती. म्हणूनच संसदेतून निवडून आलेल्या सर्व प्रतिनिधींनी पंतप्रधानाची निवड करावी आणि मंत्रिमंडळात अल्पसंख्याकांना व्यापक प्रतिनिधित्व मिळावे, असे उपाय त्यांनी सुचविले होते.

आज संविधानालाच नव्हे, तर संविधानातील समतावादी मूल्यांनाच विरोध होत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र समता विरुद्ध विषमता हा संघर्ष जुना असून, इतिहास साक्ष देतो की अखेरीस समतेचाच विजय होतो, असे डॉ. थोरात यांनी सांगितले. “हिंदू समाज अस्तित्वात आहे; पण हिंदू धर्म ही नुसती धारणा आहे,” असे बाबासाहेबांचे विधान उद्धृत करत त्यांनी स्पष्ट केले की, जे धर्मराष्ट्र उभारण्याची भाषा करतात, ते प्रत्यक्षात ब्राह्मणी राष्ट्राची संकल्पना पुढे नेत असून त्याचा पाया विषमतेवर आधारित आहे. दलित वंचित शोषित आणि बहुजन समाजासाठी धोकादायक आहे.

कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. विठ्ठल खाडे यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक लोकशाही अजून समाजात पुरेशी रुजलेली नाही. अहंकार आणि आत्ममग्नतेमुळे चळवळी शिथिल झाल्या असून, वैचारिक पातळीवर व्यापक प्रबोधन करूनच या चळवळींना नवसंजीवनी द्यायला हवी, असे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी बोधी वृक्षाच्या रोपट्यास मान्यवरांच्या हस्ते पाणी देऊन उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी करून दिला. सुरुवातीला पंकज शिरभाते आणि सुरेश दादा तळवटकर यांनी सुरेल आवाजात स्वागत गीत गाईले.
सूत्रसंचालन डॉ. विजयकुमार माहुरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. पंडित सोनाळे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी मारोतराव धुतुरे, इंजी. अनिल लोणे, एस. जे. शिरसे, तुकाराम अटकोरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

नांदेड येथील “हिंद-दी-चादर” कार्यक्रम ऐतिहासिक करावा

Next Post

प्रभाग क्रमांक १६ मध्ये भाजप पॅनलची भक्कम आघाडी; २० वर्षांचा अनुभव, १० वर्षांची कामगिरी आणि जनतेचा विश्वास एकवटला

Next Post
image editor output image1642456612 1768234419936

प्रभाग क्रमांक १६ मध्ये भाजप पॅनलची भक्कम आघाडी; २० वर्षांचा अनुभव, १० वर्षांची कामगिरी आणि जनतेचा विश्वास एकवटला

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • पोलीस ज्या निदा खानचा शोध घेत होते, तिला ३५ दिवस मतीन पटेल यांच्या घरात लपवून ठेवण्याचे कारस्थान जलील यांनीच रचले होते. बिचाऱ्या नगरसेवकाचा यात काही रोल नाही, त्याला जलील यांनीच ओढले आहे. जलील यांनी कुराणवर हात ठेवून सांगावे की त्यांनी निदा खानला शहरात आणले नाही का?
.
#SanjayShirsat #matinpatel #NidaKhan #PoliticalNews #ImtiazJaleel SatyaprabhaNews
  • मला देशातील तरुणाईसमोर एक गंभीर मुद्दा मांडायचा आहे. एक काम करा, स्वतःच गुगलवर शोधा, 2024 मधील भयानक नीट घोटाळ्यावेळी एनटीए डीजी कोण होते आणि आज मोदी सरकारने त्यांना कुठं बसवलं आहे? पाहिलंत? लक्षात आलं? तुमच्यासारख्या लाखो मेहनती विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्यांना भाजप अशा प्रकारे पुरस्कृत करते, त्यांचे संरक्षण करून प्रोत्साहनही देतं. मोदी आणि भाजप स्वतःच तुमचे भविष्य चोरण्यात भागीदार असल्याचे स्पष्ट आहे. ज्या बाजारात तुमची मेहनत आणि तुमची स्वप्ने विकली जात आहेत, तिथे एकच तत्त्व आहे, चोरी जेवढी मोठी, तेवढे मोठे बक्षीस. - राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा
.
#RahulGandhi  #india  #MarathiNews #SatyaprabhaNews
  • देशात आमदार, खासदार व अनेक पक्ष फोडत आहात हे ठिक आहे पण दरवर्षीच नीट चे पेपर कसे फुटत आहेत ? लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ खेळणा-यांची निष्पक्ष चौकशी होवून कारवाई का होत नाही ?
#rajushetti #NEETExam #UGC #MarathiNews #SatyaprabhaNews maharshtrapolitics
  • 22 आमदार घेऊन सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भाजपमधूनच लढणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे देखील काही आमदार भाजपच्या गळाला लागले आहेत. मावळचा आमदार देखील भाजपमधूनच लढणार आहे. - रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी (शप)
#RohitPawar #PrafulPatel #SatyaprabhaNews #SunilTatkare #Maharashtra NCP BJP
  • Rohit Pawar On Sunil Shelke : सुनील शेळके भाजपसोबत
जाणार,रोहित पवारांचा दावा
#sunilselke  #rohitpawar  #NCP #SatyaprabhaNews
  • सर्व परदेश दौरे रद्द करा, देवेंद्र फडणवीसांचे मंत्री आणि अधिकाऱ्यांना आदेश; राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यांचा आढावा घेतला जाणार
.
#DevendraFadnavis #politics #NarendraModi #MarathiNews #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • भारत कोणापुढेही झुकणार नाही ! जगातील कोणतीही शक्ती देशावर दबाव टाकू शकत नाही किंवा झुकण्यास भाग पाडू शकत नाही.
.
#NarendraModi #MarathiNews #SatyaprabhaNews #LatestNews #maharshtrapolitics
  • शरद पवार साहेबांची तब्येत गेली काही दिवस ठिक नव्हती. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी त्यांची वेळ मागितली होती. आज साहेबांना वेळ होता, त्यामुळे मी त्यांना आज भेटायला आलो होतो.
#suniltatkare #NCP #SharadPawar #SatyaprabhaNews #BaramatiNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10437
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8165
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6149
IMG 20260512 210505

पांदण व वहिवाट रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा; आमदारांचे प्रशासनाला निर्देश.

12 May 2026
Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
IMG 20260501 WA0538

तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..

1 May 2026

Recent News

IMG 20260512 210505

पांदण व वहिवाट रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा; आमदारांचे प्रशासनाला निर्देश.

12 May 2026
Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
IMG 20260501 WA0538

तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..

1 May 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260512 210505

पांदण व वहिवाट रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा; आमदारांचे प्रशासनाला निर्देश.

12 May 2026
Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज