नांदेड (प्रतिनिधी): नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या (Nanded Mayor Election) महापौरपदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून, आगामी टर्मसाठी हे पद ‘सर्वसाधारण महिला’ (Open Female) प्रवर्गासाठी सुटले आहे. या आरक्षणामुळे शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून, सत्ताधारी भारतीय जनता पक्षातून (भाजप) महापौर पदाच्या खुर्चीवर कोण बसणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (Nanded MahanagarPalika)
भाजपकडे महिला उमेदवारांचे संख्याबळ महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची ताकद मोठी असून, सर्वसाधारण महिला प्रवर्गातून पक्षाच्या एकूण १२ उमेदवार निवडून आल्या आहेत. या सर्व महिला उमेदवार सक्षम असल्या तरी, वरिष्ठ पातळीवर कोणाच्या नावाला पसंती मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आरक्षणाची घोषणा होताच इच्छुक उमेदवारांनी आता मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्णयाकडे लक्ष निवडून आलेल्या १२ महिला उमेदवारांपैकी या चार नावांकडे प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे. मात्र, नांदेडच्या राजकारणातील स्थानिक समीकरणे आणि पक्षातील अंतर्गत गटातटाचा विचार करून भाजपचे वरिष्ठ नेतृत्व कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालते, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
महापौरपद महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे नांदेडच्या विकासाला एक नवी दृष्टी आणि गती मिळेल, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.