दिव्यांगानी दिला प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला इशारा…
नांदेड दि.२३ जानेवारी :
बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती तथा सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिव्यांगांच्या प्रलंबित विविध मागण्यांसंदर्भात गत अनेक वर्षांपासून जिल्हास्तरावर आंदोलने करण्यात आली. परंतु त्या आंदोलनाची दखल जिल्हा स्तरावर अद्याप घेण्यात आली नसल्यामुळे आता थेट मुख्यमंत्री यांनाच निवेदन देऊन आपली कैफियत मांडण्याची भूमिका सकल दिव्यांग संघटनांनी घेतली आहे. देशाचे गृहमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्या दौऱ्यामध्ये सकल दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी भेट घडविण्यासाठी संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन मागणी केली असल्याचे पत्र संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी प्रसार माध्यमांना दिले आहे. दिव्यांगांच्या विविध मागण्या अद्यापही प्रशासनाच्या वतीने पूर्ण झालेल्या नाहीत. वारंवार हजारो निवेदने देऊन.शेकडो आंदोलने उपोषणे करून मोर्चे काढुन, बैठका घेऊनही प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती तथा सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आता आक्रमक पवित्रा घेत थेट केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांचेच लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी त्यांना भेटुन निवेदन सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्या दौऱ्यानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती तथा सकल दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांची भेट करून देण्यासाठी संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन मागणी केली आहे. भेट नाही झाल्यास सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आक्रमक भूमिका घेत एकापेक्षा अनेक प्रकारचे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करत केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना घेराव घालो आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी निवेदनामध्ये प्रशासनाला दिला आहे. या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांची स्वाक्षरी आहे तर या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे व्यंकट कदम, सय्यद आतिक हुसेन, रवि कोकरे,नागनाथ कामजळगे, आदित्य पाटील, सय्यद आरिफ,शेख उमर, कार्तिक कुमार भरतिपुरम. सिद्धोधन गजभारे,शिवाजी सुर्यवंशी. मोहसिन कादरी, प्रदिप हनवते, शेख आलीम, भोजराज शिंदे,शेख माजीद, शिवराज बंगरवार, माधव हिवराळे,अजय गोरे,रमेश लंकाढाई, राजु इराबत्तीन, प्रशांत हणमंते, किरणकुमार न्यालापल्ली, शंकर गिमेकार, व्यंकट कदम, सिद्धोधन गजभारे,मुंजाजी कावळे, शेख सिराज, शेख सादिक,शेख सुफियान, अब्दुल माजीद शेख चांद, सईद वैद्यजी.भाग्यश्री नागेश्वर, सविता गवते, कल्पना सकते, अफरोजा खानम, शेख जैनाज यासह सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.












