मुंबई दि.३१ जानेवारी : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेल्या अनेक दशकांपासून महिला नेतृत्वाचा बोलबाला असला तरी, अद्याप राज्याला महिला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री लाभलेले नव्हते. मात्र, आज इतिहास बदलला असून महाराष्ट्र राज्याला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शनिवार दि. ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याची शपथ धेतली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपला वारसा पुढे नेण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाला हिरवा कंदिल दिला होता सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकरण्यास होकार दिल्याने त्यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आता त्यांच्याकडे कोणती खाते सोपावली जाणार हे पाहाणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.












