• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Thursday, June 18, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

Ajit pawar: अजितदादांच्या आठवणीने ‘बिग बॉस’च्या मंचावर रितेश देशमुख भावूक; साश्रू नयनांनी वाहिली आदरांजली, म्हणाला – ‘तुमची जागा कोणीच घेऊ शकणार नाही’

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
3 February 2026
in Top News, मनोरंजन, महाराष्ट्र
image editor output image 1766829439 1770088632534
33
SHARES
220
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

मुंबई दि.३ फेब्रुवारी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेने केवळ राजकीय वर्तुळच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. अजितदादांच्या अशा अचानक एक्झिटमुळे सर्वत्र शोककळा पसरली असून, सामान्य कार्यकर्त्यांपासून ते दिग्गज नेत्यांपर्यंत सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत. अजितदादांचा करारी आवाज, प्रशासंवरील पकड आणि कार्यकर्त्यांवरील प्रेम यांच्या आठवणीत प्रत्येकजण व्याकुळ झालेला दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाचा सूत्रसंचालक आणि अभिनेता रितेश देशमुख याने शोच्या मंचावर आपल्या लाडक्या ‘दादां’ना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी अजितदादांच्या आठवणी सांगताना रितेशला अश्रू अनावर झाले होते.

कार्यक्रमाची सुरुवात करतानाच रितेश देशमुखने आपल्या जड अंतःकरणाने भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, “२८ जानेवारीचा सूर्य उगवला, पण तो सोबत सकाळऐवजी एक काळरात्र घेऊन आला. त्या दिवशी मिळालेल्या बातमीने जो धक्का दिला, त्यातून मी स्वतः आणि अख्खा महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांचे अपघाती निधन झाले, ही घटना माझ्यासारख्या असंख्य महाराष्ट्र प्रेमींच्या काळजाला चटका लावणारी आहे. कारण ते केवळ राज्याचे उपमुख्यमंत्री नव्हते, तर ते आपल्या सर्वांचे हक्काचे आणि लाडके ‘दादा’ होते. आपण सर्वजण जरी त्यांना प्रेमाने अजितदादा म्हणत असू, तरी खऱ्या अर्थाने ते एक ‘बाप माणूस’ होते.”

रितेशने आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना पुढे म्हटले, “दादा, आज या मंचावर उभे राहून तुमच्याबद्दल असे बोलावे लागेल, याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. तुमच्या आवाजातील जरब आणि नजरेचा धाक समोरच्या व्यक्तीला नि:शब्द करण्याची ताकद ठेवत असे. पण, आज तुमच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र नि:शब्द झाला आहे. तुमचे व्यक्तिमत्त्व म्हणजे शिस्त, माया आणि सामाजिक जाण यांचा एक दुर्मिळ त्रिवेणी संगम होता. तुमचे ओरडणे किंवा रागावणेसुद्धा समोरच्याला कौतुकाची थाप वाटायची. अनेक वर्षांपासून रखडलेली कामे तुमच्या केवळ एका आदेशावर मार्गी लागत असत. म्हणूनच, सामान्य माणसाच्या आयुष्यातील तुम्ही खऱ्या अर्थाने ‘कामाचा माणूस’ होतात. तुमच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचे तुम्ही सोने केले.”

अजितदादांच्या दिलखुलास आणि मिश्किल स्वभावाचा एक किस्सा सांगताना रितेश म्हणाला, “तुमचा तो अंदाज प्रत्येकाच्या स्मरणात राहील. आपल्याच एखाद्या कार्यकर्त्याने ‘लव्ह यू’ म्हटल्यावर, ‘अरे, मला काय लव्ह यू म्हणतोस, बायकोला म्हण. म्हणजे आधी स्वतःच्या कुटुंबाकडे बघ आणि मग गावाकडे लक्ष दे’, असा कानमंत्र देणारा माणूस आता आपल्यात उरला नाही. दादा, हे सत्य आहे की तुमची जागा दुसरे कोणीही घेऊ शकणार नाही. कारण राजकारणाची इतकी प्रगल्भ जाण आणि माणुसकीचे भान असलेला तुमच्यासारखा नेता पुन्हा शोधूनही सापडणार नाही.”

शेवटी रितेशने महाराष्ट्राने गमावलेल्या इतर नेत्यांची आठवण काढत म्हटले, “दुर्दैवाने महाराष्ट्रासाठी अहोरात्र झटणारी अनेक ‘बापमाणसं’ काळाने वेळेआधीच हिरावून नेली आणि सर्वांना पोरके केले. आदरणीय विलासराव देशमुख साहेब, गोपीनाथ मुंडे साहेब, आर.आर. पाटील साहेब, प्रमोद महाजन आणि आता तुम्ही… तुम्ही सर्वांनीच एकच धर्म पाळला, तो म्हणजे ‘महाराष्ट्र धर्म’. म्हणूनच आज महाराष्ट्रातील प्रत्येकाचे डोळे पाणावले आहेत. दादा, तुम्ही कालही आमची प्रेरणा होतात, आजही आहात आणि उद्याही राहाल. हीच प्रेरणा घेऊन मी माझ्या कामाला सुरुवात करतो,” अशा शब्दांत रितेशने आपल्या भावना व्यक्त केल्या.

टीप: बातमीतील व्यक्तीचा फोटो मूळ (Original) आहे. फोटोच्या चांगल्या सादरीकरणासाठी (Presentation) आणि ग्राफिक्ससाठी AI तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

Previous Post

सुनेत्रा पवार यांच्या निवडीवरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल; ‘घराणेशाही’च्या मुद्द्यावर दुतोंडी भूमिकेचा घेतला समाचार

Next Post

Rohit pawar:  सुप्रीम कोर्टाचा रोहित पवारांना दणका; महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकांवरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Next Post
image editor output image 1203085351 1770130194558

Rohit pawar:  सुप्रीम कोर्टाचा रोहित पवारांना दणका; महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकांवरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • या देशात गेल्या 12 वर्षांत मोदी सरकारचं सर्वात मोठं कर्तृत्व म्हणजे त्यांनी केलेली लोकशाहीची हत्या! विरोधक संपवण्यासाठी आधी नेते फोडायचे, नेते नाही फुटले तर थेट पक्षच फोडायचा, खासदार-आमदार पळवायचे, हाच यांचा धंदा. - वर्षा गायकवाड, खासदार, काँग्रेस
.
#VarshaGaikwad #LokSabha #BJP #ShivsenaUBT #SatyaprabhaNews LatestNews
  • मुख्यमंत्रीपदावर डोळा ठेवून ईर्ष्या चालली आहे. दिल्लीला जात आहेत, परत निराश होऊन येत आहेत. फडणवीस साहेब सहज हलतील का बाजूला? कुणाला तरी शह देण्यासाठी आमची ताकद कमी करायची आणि माझी ताकद वाढवून दाखवून दिल्लीसमोर जायचं आणि दाखवायचं की आता मी मुख्यमंत्री होऊ शकतो अस अत्यंत चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे. : - संजय पवार, उपनेते (शिवसेना ठाकरे गट)
#SanjayPawar #DevendraFadnavis #Maharashtra #LatestNews  #SatyaprabhaNews
  • उद्धव ठाकरेंचे आमदार, खासदार कुठे जातायत आणि का जातायत, याच्याशी भाजपला काहीही देणंघेणं नाही. यात भाजपचा काहीही संबंध नाही - चंद्रशेखर बावनकुळे
#ChandrashekharBavankule #udhhavthakeray #SatyaprabhaNews #bjp #ShivsenaUBT MarathiNews PoliticalNews
  • लग्न एकासोबत करायचं आणि भलत्याचाच हात धरून पळून जायचं... हा अत्यंत किळसवाणा राजकीय व्यभिचार असून संविधान व लोकशाही मोडून हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु असल्याचं हे लक्षण आहे. याला ‘ऑपरेशन टायगर’ नाही ‘ऑपरेशन बाजार’ म्हणावं लागेल आणि हा ‘ऑपरेशन बाजार’ लायकीचा, माणसांचा की विचारांचा हे लोकंच ठरवतील. - रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी (शप)
#RohitPawar #Shivsena #Maharashtra #SatyaprabhaNews #OperationTiger MaharashtraPolitics
  • 🚨 महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी खळबळजनक बातमी! 🚨राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, उद्धव ठाकरेंचे तब्बल ६ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे!
.
#MaharashtraPolitics #Shivsena #EknathShinde #UddhavThackeray #PoliticalCrisis BreakingNews SatyaprabhaNews MarathiNews SatyaprabhaNews
  • ओमराजेंना मी सकाळी फोन केला, पण माझा फोन त्यांनी उचलला नाही. मग मी त्यांच्या पाठीशी भावासारखे, सावलीप्रमाणे सोबत असणाऱ्या आमदार कैलासदादा पाटील यांना फोन केला. ते म्हणाले, ताई मी दुसऱ्यांची गॅरंटी कशी देऊ, मी माझी गॅरंटी देऊ शकतो. त्यामुळे कैलास पाटलांच्या बोलण्यातील संधिग्धता बरीचशी बोलकी आहे. - सुषमा अंधारे, उपनेत्या, शिवसेना ठाकरे गट
#SushmaAndhare #OmrajeNimbalkar #MaharashtraPolitics #LatestNews  #SatyaprabhaNews
  • अखेर ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन
.
#UddhavThackeray #EknathShinde #MaharashtraPolitics #Shivsena #SatyaprabhaNews
  • ऑपरेशन टायगर सोपं नाही. आमच्यापर्यंत अशाप्रकारच्या कोणत्याही घडामोडींची अधिकृत माहिती नाही. आम्ही मीडियाच्या माध्यमातून पाहतोय, ऐकतोय. 16 जूनला रात्री मला 11.30 वाजता एका व्यक्तीने सांगितलं महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जातंय. मी म्हटलं भाव काय आहे? ते म्हणाले, भाव तोच आहे, 50-50 कोटी... - संजय राऊत, खासदार, शिवसेना ठाकरे गट
#SanjayRaut #Maharashtra #LatestNews #MarathiNews #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 548252535 1685356041380

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

0
image editor output image1726156324 1685356360185

गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

0
image editor output image1783743501 1685356629739

सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

0
मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

0
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026
IMG 20260611 215403

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…

11 June 2026

Recent News

image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026
IMG 20260611 215403

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…

11 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज