नांदेड दि.२९ मे:मराठवाडा मुक्ती संग्रामातील लढाऊ नेतृत्व, अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे क्रांतीकारक आणि थोर स्वातंत्र्य सैनिक स्व. बालारामजी यादव यांची पुण्यतिथी नुकतीच नांदेड येथे अत्यंत आदराभावाने साजरी करण्यात आली. या प्रसंगी त्यांच्या कार्याची दखल घेत नांदेडकरांनी या महान स्वातंत्र्य सैनिकाला अभिवादन केले.
नामकरण फलकास पुष्पहार अर्पण
पुण्यतिथीनिमित्त वजीराबाद येथील त्यांच्या नामकरण फलकास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच, यादव अहेर मंडल येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून उपस्थितांनी मौन बाळगत आदरांजली वाहिली.
या श्रद्धांजली कार्यक्रमास समाजमनातील अनेक दिग्गज आणि स्व. यादव यांचे स्नेही उपस्थित होते. यामध्ये भारत भूषण यादव, गोकुल यादव, संजय फुलारी, गगन यादव, सतीश यादव, गोपाल फतेहलष्करी, राजेश कुलकर्णी, डॉ. कैलास यादव, ईश्वर यादव, स्वराज यादव राहुल ठाकुर आणि अजय यादव यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
स्वतंत्र्य संग्रामातील गौरवशाली इतिहास
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या काळात निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध बालारामजी यादव यांनी दिलेला लढा अत्यंत प्रेरणादायी आहे. आपल्या प्राणांची बाजी लावून त्यांनी जनसामान्यांच्या स्वातंत्र्यासाठी आणि मराठवाड्याच्या अस्मितेसाठी मोठा संघर्ष केला होता. त्यांच्या याच बलिदानाची आठवण या निमित्ताने उपस्थितांनी करून दिली. आजच्या तरुण पिढीला त्यांच्या कार्याचा वारसा कळावा, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!






















