तुषार कांबळे! हदगाव प्रतिनिधी!
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखला जातो जनसामान्याचे प्रश्न आपले लेखणीतून जगासमोर वास्तव मांडणी करतो पण कधी चुकीचे वृत् छापून पीत पत्रकारीता करतो तेव्हा लोकशाही जिवंत ठेवायचे असेल तर सर्व पत्रकारांनी पित्त पत्रकारिता करणे टाळावी असे मत प्रा. डॉ. गणेश जोशी यांनी तामसा तालुका हदगाव येथे हदगाव विधानसभा क्षेत्रातील पत्रकार मेळावा पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक पदावरून बोलताना व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. आनंदराव पाटील घंटलवाड हे होते तर प्रमुख उपस्थिती आमदार बाबुराव कदम कोहोळीकर रमेश घटलवाड स. द कल्याणें सहायक पोलीस निरीक्षक सहदेव खेडकर पोलीस उपनिरीक्षक बालाजी नरवटे बालाजी महाजन पंडित पतंगे प्रकाश जैन यांचे उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविक भाषणात बालासाहेब खानजोडे यांनी पत्रकारावर होत असलेल्या बाबत विवेचन करून पत्रकार एकजुटीने राहाणे काळाची गरज आहे
व पत्रकारांच्या सुखदुःखात सहभागी होणे पत्रकारावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यासाठी हा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले यावेळी प्रा. डॉ. गणेश जोशी पुढे बोलताना म्हणाली पत्रकाराच्या संघटना अनेक झाल्या त्यांनी ऐनवेळी एकजूट होऊन पत्रकाराच्या समस्या सोडविण्याचे काम करावे कोणत्याही
राजकीय पक्षाच्या नेत्याची आपण हुजरेगिरी करू नये त्यांचे चांगल्या कामाची वाहवा जरूर करा पण वाईट कामाच्या बाबतीत प्रखरपणे लेखन करने पत्रकाराचे काम आहे . सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देणे आपल्या लेखणीतून वास्तव लेखन केले की सर्वसामान्यांना न्याय मिळतो पत्रकार वाघ आहे तसेच जंगलात एक वाघ पाहिला तर आपण पळून जातो तसेच आपली वचक वाघाप्रमाणे असली पाहिजे कोणाच्या आमिषाला बळीने पडता प्रखरपणे ने लिखाण करा लेझीम खेळत संध्याकाळी घरी जाऊ नका असा मौलाचा सल्लाही त्यांनी आपल्या भाषणातून दिला. यावेळी. आ. बाबुराव कदम कोहळीकर यांनी आपल्या भाषेत म्हणाले की माझ्या विधानसभा क्षेत्रातील सर्व पत्रकारांच्या
समस्या सोडविण्यासाठी तयार आहे आणि त्यांचा जीवन विमा आरोग्य विमा दरवर्षी मी माझ्या पैशाने काढत जाईल यासाठी लागणारे कागदपत्र माझ्या कार्यालयात आणून द्या असा सल्ला देऊन कार्यक्रम शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमात आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार पत्रकार गौतम कदम सुनील चौरे गौतम वाठोरे गौतम रणवीर महेंद्र धोंगडे यांना तर डॉ बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार शशिकांत धानोरकर इस्माईल पिंजारी सोपान बोंबीलवार नागेश शिंदे रामेश्वर बोरकर तर उद्योजक म्हणून बालाजी घंटलवार प्रभाकर कदम बंटी राठोड सुशील कुमार देशमुख या सर्वांचा सन्मान करण्यात आला सरसेनापती नेताजी पालकर उत्कृष्ट पुरस्कार म्हणून दीपक सूर्यवंशी प्रकाश जैन यांना पुरस्कार देऊन प्रदान करण्यात आला. संचलन संजय राहुलवार यांनी केल, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे अर्जुन जोशी बालासाहेब खानजोडे इफराज शेख आदिने परिश्रम घेतले





















