तुषार कांबळे! हदगाव प्रतिनिधी | हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे आज दिनांक १५/६/२०२६ रोज सोमवार या दिवशी विद्यार्थ्यांना शालेय प्रवेश देण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी विकास पत्र टेबल, शारीरिक विकास क्षमता, बौद्धिक विकास क्षमता, सामाजिक आणि भावनात्मक विकास क्षमता, भाषा विकास क्षमता, गणनपूर्व तयारी क्षमता, प्रमाणपत्र अभिनंदन असे सात टेबल लावून विद्यार्थी प्रवेश करण्यात आले. व विद्यार्थ्यांच्या पायांचे ठसे घेण्यात आले.
इयत्ता पहिलीत आलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले, गावातील ज्येष्ठ पत्रकार आदरणीय श्री तुषार कांबळे यांचे चिरंजीव इयत्ता पहिलीत प्रवेश झाल्यामुळे त्यांचा सुद्धा पालक म्हणून शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री रमेश राठोड सर, सहशिक्षक श्री नागनाथ कुंडलवार सर, मोहसीनखान पठाण सर, भारतध्वज सरपे सर, बालाजी चक्रधर सर, सोनटक्के सर, पत्रकार तुषार कांबळे सर व गावातील शिक्षण प्रेमी नागरिक व पालक उपस्थित होते उपस्थितांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
सत्यप्रभा न्यूज नांदेड






















