नांदेड.दि.२३-देगलूर शहरात एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 64 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच भोकर शहरात एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 92 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
रामलू मारोतराव कोटीलवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 21 ऑक्टोबरच्या सकाळी 11 ते दुपारी 2.30 वाजेदरम्यान अनुसंपदा निवास सुभाषनगर भक्तापुर रोड देगलूर येथील त्यांच्या घराचे लॉक तोडून चोरट्यांनी शयन कक्षातील लोखंडी कपाटाचे लॉकर लॉक तोडले आणि त्यामध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिणे असा एकूण 2 लाख 64 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. देगलूर पोलीसांनी हा चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक फड अधिक तपास करीत आहेत.
भोकर येथील चंदर दिगंबर पांडेवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.22 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 1 ते 3 वाजेदरम्यान त्यांचे प्रफुल्लनगर येथील घर बंद करून ते मुळगाव बिनताळ येथे गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी 1 लाख 92 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरुन नेले आहेत. भोकर पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक दिगंबर पाटील अधिक तपास करीत आहेत. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!