• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, July 21, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र मुंबई

नाशिकच्या बुद्ध स्मारकात आज बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण; देश-विदेशांतील भिक्खू, हजारो भीम अनुयायांची उपस्थिती

Satyaprabha News by Satyaprabha News
24 October 2023
in मुंबई, Top News
नाशिकच्या बुद्ध स्मारकात आज बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण; देश-विदेशांतील भिक्खू, हजारो भीम अनुयायांची उपस्थिती

नाशिकच्या बुद्ध स्मारकात आज बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण; देश-विदेशांतील भिक्खू, हजारो भीम अनुयायांची उपस्थिती

32
SHARES
215
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नाशिक | नाशिकच्या (Nashik) पांडवलेणी परिसरात असलेल्या बुद्ध स्मारकाच्या परिसरात आज श्रीलंका (Sri Lanka) तील अनुराधापुर येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण केले जाणार आहे. महाराष्ट्र शासन (Maharashtra Govt.) आणि शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात श्रीलंका, थायलंड, कोरिया, ब्रम्हदेश, मलेशिया, जपान, तैवान, व्हिएतनाम आणि कंबोडिया या देशातील भन्ते आणि उपासक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

त्रिरश्मी लेणीवर भीम अनुयायांची प्रचंड गर्दी
आज सर्वत्र विजयादशमी दसरा सण साजरा करण्यात येत असून नाशिकमध्ये देखील दसऱ्याला विशेष महत्व आहे. नाशिक शहरातील त्रिरश्मी लेणीवर भीम अनुयायांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे दीक्षाभूमीवर दीक्षा ग्रहण केली होती. त्यामुळे हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा करण्यात येतो. त्यामुळे आजच्या दिवशी त्रिरश्मी लेणीवर मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी दाखल होत असतात. तर आज विशेष म्हणजे याच त्रिरश्मी लेणीवर श्रीलंकेतील अनुराधापुर येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण केले जाणार आहे. भगवान बुद्धांना ज्या बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले, त्याच वृक्षाच्या फांदीचे नाशिकमध्ये रोपण करण्यात येणार आहे. त्यामुळे आज मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे. या महोत्सवाला उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक मंत्री उपस्थित राहणार असून श्रीलंका, थायलंड, मलेशियासारख्या देशांतूनही महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने चोख पोलीस बंदोबस्त
दरम्यान, या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर त्यासाठी बुद्धस्मारक परिसरात वाहन व्यवस्था, येणाऱ्या बौद्ध उपासकांची निवास, भोजन व्यवस्था आणि इतर सोयी-सुविधांचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. सम्राट अशोक यांनी विजयादशमीच्या दिवशी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही विजयादशमीच्या दिवशी नागपूर येथे धम्मदिक्षा घेतली आणि त्याच पार्श्वभूमीवर शांततेचा संदेश देण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्री छगन भुजबळ हे या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष असून केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, दादा भुसे हे कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

देश-विदेशांतील भिख्यू, उपासकांची उपस्थिती
या सोहळ्यासाठी संपूर्ण बुद्ध स्मारक परिसराची सजावट करण्यात आली आहे, तर बौद्धस्तुप आकर्षक रंगसंगतीने उजळून निघाला आहे. या महोत्सवासाठी श्रीलंका, थायलंड, मलेशिया, कंबोडिया आणि नेपाळ येथील प्रमुख भीख्यू आणि मान्यवरांचे नाशिकमध्ये आगमन झाले आहे. जिल्ह्यातील उपासक, उपासिका हजारोंच्या संख्येने उपस्थित राहाणार आहेत. सोमवारी दिवसभर या सर्वांच्या आगमनाची तयारी सुरू होती. बुद्ध स्मारकाच्या परिसरात फांदी रोपण होणारी जागा सजविण्यात आली असून, संपूर्ण परिसरात मंडप टाकण्यात आला आहे. परिसर पंचशील ध्वजांनी सजविण्यात आला असून, बॅरिकेटस् टाकून मार्ग निश्चिती करण्यात आली आहे. मुख्य सोहळ्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. बोधीवृक्ष फांदीरोपण बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. सोहळ्यासाठी येणाऱ्या उपासक, उपासिकांसाठी मागणीनुसार जाणार असल्याचे महामंडळाच्या विभाग नियंत्रकांकडून सांगण्यात आले, तशा सूचना त्यांनी सर्व आगारप्रमुखांना देण्यात आल्या आहेत.

Tags: Dasra 2023Local NewsMaharashtraMaharashtra NewsNashik Local NewsNashik NewsSatyaprabha NewsShri Lankaबुद्ध स्मारकमहाबोधीवृक्ष महोत्सव 2023हजारो भीम अनुयायांची उपस्थिती
Previous Post

4 लाख 36 हजारांच्या दोन चोऱ्या

Next Post

हिमायतनगर शहरात बजरंग दल विश्व हिंदू परिषदे तर्फे आज सायंकाळी आठ वाजत रावणदहन…

Next Post
IMG 20231024 150521

हिमायतनगर शहरात बजरंग दल विश्व हिंदू परिषदे तर्फे आज सायंकाळी आठ वाजत रावणदहन…

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026

    Recent News

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज