
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- शहरातील भारतीय जनता पार्टी तालुका शाखेच्या वतीने आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांच्या आदेशावरून शहरातील गोरगरीब व पालामध्ये( झोपडी मध्ये )राहणाऱ्या नागरिकांना व त्यांच्या मुलांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी या उद्देशाने भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशावरून तालुका अध्यक्ष गजानन चायल यांच्या अध्यक्षतेखाली असंख्य भाजपा कार्यकर्त्यांनी पालावर(झोपडीवर)जाऊन भारतीय जनता पार्टी कडून गोर गरीब नागरिकांना फराळाचे वाटप करून त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या….

या बाबत सविस्तर वृत्त असे की दिवाळी म्हटले, की नवीन कपडे, फटाके आणि खाऊ असे चित्र प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभे राहते. सर्वसामान्य घरातील मुलांना त्यांचे आई-वडील बाजारात नेऊन ही खरेदी करून देतात. पण पाण्यामध्ये राहणाऱ्या गोरगरीब नागरिकांच्या मुलांना व अनाथ मुला-मुलिना दिवाळी खरेदीचा आनंद लुटला येत नाही म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता ताई पाटील संघटन मंत्री संजय गोडगे यांच्या आदेशावरून व जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी हिमायतनगर शहरातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी शहरातील पालावर (झोपडीत ) राहणाऱ्या नागरिकांच्या घरी जाऊन तेथील गोरगरीब नागरिकांना दिवाळीच्या फराळाची भेट देऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करून त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गजानन तुप्तेवार, डॉ प्रसाद डोंगरगावकर, भाजपा तालुकाध्यक्ष गजानन चायल, कल्याण ठाकूर,दुर्गेश मंडोजवार ,उपाध्यक्ष बालाजी मंडलवार,लक्ष्मण ढणके , सरचिटणीस रुपेश भुसावळे,तानाजी सोळंके,शुभम बरसेटवार,परमेश्वर नागेवाड,विशाल अंनगुवार,ओमकार चरलेवार,हरीश गुंडेकर सह भाजपा व युवा मोर्चाचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते













