हिमायतनगरः तालुक्यातील मौजे मंगरुळ येथे ग्रामपंचायत कार्यालय येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेला अभिवादन करुन संविधान दिवस साजरा करण्यात आला. तसेच गावाचे उपसरपंच तथा काँग्रेस पक्षाच्या अनुसुचित जाती विभागाचे तालुकाध्यक्ष संतोष आंबेकर यांच्या वतीने संविधानाच्या प्रास्ताविकाचे गावात वितरण करण्यात आले.तसेच ठिकठिकाणी सामुहीक प्राताविका वाचन करण्यात आले.
भारतीय संविधान भारत देशाचा प्राण आहे. कारण विविधतेने नटलेल्या देशाला एकसंघ ठेवण्याची किमया भारतीय संविधानाने केली आहे. असे प्रतिपादन श्री.संतोष आंबेकर यांनी केले आहे.
यावेळी सरपंच प्रतिनीधी जीवन जैस्वाल, बालाजी पावडे, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष गुलझरवाड, बालाजी गुंठेवाड, तिरुपती सोमनवाड शंकर गुंठेवाड, रमेश रुद्रबोईनवाड, रामराव पाटील, शंकर गुंठेवाड, विकास बोरकर ,विकास कुंजरवाड ,संजय रुद्र बोईनवाड ,परमेश्वर चिट्टे बोईनवाड ,सुनील गुंटेवाड ,सत्तार भाई, गजानन कुजरवाड ,गजानन रुद्र बोईनवाड ,परमेश्वर चिटेबोईनवाड,आदींची उपस्थिती होती.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड