
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी ! विजय पाटील !
दि : ०८/०१/२०२४
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात घेण्यात येणा-या ’इंद्रधनुष्य’ आंतरविद्यापीठ युवक महोत्सव मार्च महिन्यात घेण्यात येणार आहे. ’राजभवन’ येथे आढावा बैठक घेऊन आयोजनाबाबत नियोजन करण्यात आले.
महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १९ व्या ’इंद्रधनुष्य’चे यजमानपद दिले. तत्कालीन कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी २० ऑक्टोबर रोजी मा.कुलपती रमेश बैस यांची भेट घेवून महोत्सवाचे यजमान दिले. ५ ते ९ नोव्हेंबर दरम्यान महोत्सवाच्या तारीख घोषित झाल्या होत्या. तथापि, हा महोत्सव पुढे ढकलण्यात आला. या महोत्सवाच्या आयोजनसदंर्भात सोमवारी (दि.आठ) मुंबईत राजभवनला बैठक घेऊनय ’इंद्रधनुष्य’ महोत्सव तयारीचा आढावा घेतला.
यावेळी राजभवनाच्या सचिप श्वेता सिंघल, अप्पर सचिव विकास कुलकर्णी, निरीक्षक डॉ.प्रमोद पटकेकर, डॉ.गोविंद कनलाडे आदी उपस्थिती होती. तसेच कुलसचिव दिलीप भरड, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.वैâलास अंभुरे यांची उपस्थिती होती. कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सवाच्या आयोजनाची जय्यत तयारी सुरु असल्याची माहिती कुलसचिव दिलीप भरड यांनी दिली. उन्हाळी परीक्षापुर्वी महोत्सव घेण्याबद्दल बैठकीत चर्चा करण्यात आली. या महोत्सवाच्या तारीख पाहुणे आदी बाबत मा.कुलगुरुंच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात येणार आहे.
तिस-यांदा आयोजन- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात यापूर्वी २००६ व २०१५ असे दोन वेळा ’इंद्रधनुष्य’चे यशस्वी आयोजन करण्यात आले. तिस-यांदा हा महोत्सव घेण्यात येणार आहे. महोत्सवासाठी २३ विद्यापीठाचे सुमारे ११०० युवा कलावंतांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.कैलास अंभुरे यांनी दिली.
सत्यप्रभा न्यूज