
हिमायतनगर प्रतिनिधी/- शहरातील वार्ड क्रमांक १ आणि वार्ड क्रमांक १७ मधील सर्व मुख्य रस्त्यावरील पथ दिवे अनेक महिन्यांपासून बंद आहेत. हे पथदिवे लवकरात लवकर सुरु करावेत अशी मागणी माजी नगरसेविका सौ. सुरेखा सदाशिव सातव यांनी येथील नगर पंचायतच्या मुख्याधिकारी यांनी केली आहे.
शहरातील नगर पंचायतच्या मुख्याधिकारी तथा प्रशासकांना त्यांनी दि 29 फेब्रुवारी रोजी एक लेखी निवेदन दिले त्यात हिमायतनगर नगर पंचायतवर प्रशासक असल्याने शहरातील अनेक कामे रखडली आहेत. शहरातील अनेक भागातील पथ दिवे बंद आहेत. ठिकठिकाणी अस्वच्छता असून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वार्ड क्रमांक १७ मधील नागरीकांनी या भागाच्या माजी नगरसेविका सौ सुरेखाताई सदाशिव सातव यांच्याकडे नगरपंचायत प्रशासकीय यंत्रणेच्या उदासिनतेबद्दल संताप व्यक्त केला. त्यामुळे सातव यांनी जनतेचे प्रश्न लक्षात घेऊन नगरपंचायतिचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. यामध्ये अनेक भागात स्वच्छतेची गाडी महिना भर फिरकत नसल्यामुळे अनेक भागात दुर्गंधी पसरली आहे.वार्ड क्रमांक १ ते वार्ड क्रमांक १७ मधील मुख्य रस्त्यावरील पथ दिवे तात्काळ बसविण्यात यावे व अनेक महिन्यांपासून नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. लवकरच परमेश्वर यात्रा महोत्सव सुरू होणार आहे. त्यामुळे यात्रेपूर्वी सर्व पथदिवे सुरु करावेत. अशी मागणी सातव यांनी नगर पंचायत प्रशासनास केली आहे.यावेळी नगरसेविका प्रतिनिधी सदाशिव सातव हे उपस्थित होते












