आंदोलनाचा इशारा देताच तहसीलदार गैरहजार
हदगाव दि.१६: हदगाव तालुक्यातील सन २०२३ खरीप हंगाम सोयाबीन, कापूस पीकाचे भाव कमी झाले म्हणुन शासनाने सरसकट अनुदान जाहीर केले पण युनायटेड ईडीया विमा कंपनीने सोयाबीन कापूस, तुर ज्वारी या पीकाचे विमे काढले असले तरी मात्र २५ टक्केच रक्कम दिली असून उर्वरीत ७५ टक्के रक्कम नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ७२ तासांची अट टाकली होती. पण शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा दावा करण्यासाठी साईड बंद होते व टोल फ्री क्रमांक लागला नसल्याने शेतकरी दावा करू शकले नाही.त्यातच हदगांव येथे विमा कंपनीचे कार्यालय नसल्यामुळे शेतकरी ऑफ लाईन अर्ज करू, शकले नाही. व कृषी कार्यालयाने अर्ज स्विकारले नाही. या शासनाच्या व विमा कंपनीच्या चुकीमुळे शेतकरी विमा रक्कमेपासून वंचित राहिला असून प्रशासन यांच्या चुकीमुळे सदर शेतकऱ्यांना विमा भेटला नाही. यासाठी आज लक्ष्मण कदम रुईकर यांच्या नेतृवत खेकडा आंदोलन करण्यात आले.लक्ष्मण कदम यावेळी लक्ष्मण कदम यांनी आमच्याशी बोलतांना सांगितले कि ई पीक पाहणी अट रध्द करून सरसकट शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे. शेतकऱ्यांची उर्वरीत पीकवीमा रक्कम लवकरात लवकर बँक खात्यावर देण्यात यावी अशी मागणी करत मागण्या मान्य नाही झाल्यास सामुहीक आत्मदहन करण्याचा इशारा ही त्यानी यावेळीस प्रशासनाला दिला असून यावेळी अंबादास कदम सतीश वानखेडे विश्वास कदम शिवशन्कर भगवान चव्हाण राजू भाऊ रुईकर व इतर कार्यकर्त्यासह शेतकऱ्यांसह मोठा पोलीस बंदोबस्त होता.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड












