गर्भपाताचे रॅकेट उघडकीस येताच गर्भपातासाठी आलेल्या 2 महिला सह बोगस डॉक्टर फरार, घटना स्थळी इंजेक्शन, औषधांचा साठा जप्त…,हिमायतनगर पोलिसात गुन्हा दाखल…
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे दि.१७: तालुक्यातील मौजे सरसम येथे दोन महिलांचा गर्भपात करीत असल्याची खबर वैद्यकीय अधिकाऱ्यांना लागताच तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आपली टीम नेली असता संबंधित डॉक्टरच्या घरी गर्भ पाताचे साहित्य सोडून तो बोगस डॉक्टर फरार झाला असल्याचे सांगण्यात आले यासंदर्भात हिमायतनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौकट
या अवैध गर्भपाताच्या घटनेमागे कोण कोण दडले ?
हिमायतनगर तालुक्यात सर्वात मोठी घटना घडून आठ दिवस ओलांडले तरी पण या घटनेतील आरोपीचा हिमायतनगर पोलीस अद्याप शोधच घेत आहेत याचे कारण काही स्पष्ट कळेना नवजात बालकांचा जीव घेणाऱ्या अमानुष बोगस डॉक्टरांचा शोध पोलीस का घेत नाहीत ? यामागे कोणते कारण आहे हे अद्याप कळू शकले नाही व बोगस डॉक्टरांनी आतापर्यंत कित्येक नवजात बालकांचा गर्भपात करून प्राण घेतला हे मात्र अद्याप कळायला तयार नाही ह्या घटनेची चर्चा जिल्ह्यात होत आहे या अवैध गर्भपाताच्या पाठीमागे कोण कोण दडले हे मात्र अद्याप कळू शकले नाही…. आरोपीला अटक झाल्यानंतर कित्येक जणांनी गर्भपात केल्याची कबुली डॉक्टरांच्या तोंडून ऐकण्यास मिळणार आहे त्यामुळे हे प्रकरण आता वेगळ्या वळणाकडे जात असल्याची चर्चा शहरात रंगत आहे
तालुक्यातील मौजे सरसम येथील आरोग्य केंद्राचे अधिकारी वैभव निखाते यांना सरसम गावातून दि.१३ ऑगस्ट रोजी एका व्यक्तीचा फोन आला. यात नवी आबादी परिसरातील महिलेच्या घरी पंडीत कळूराम वाठोरे (वय ५०) हा गर्भवती महिलेचे अवैधरित्या गर्भपात घडवून आणत आहे. यासाठी तेथे दोन महिला आल्या आहेत, अशी माहिती दिली. या माहितीच्या आधारे वाहनचालक प्रेमसिंग मोहिते यास सोबत घेऊन साडेसातच्या सुमारास घटनास्थळी पोहचले. ज्या घरात महिलेचा गर्भपात करण्याची तयारी सुरू होती तेथे भेट देऊन तपासणी केली. यावेळी सदर इसम वाठोरे व त्याच्यासोवतच्या दोन महिला अंधाराचा फायदा घेऊन फरार झाल्या. या घरात अधिकची तपासणी केली असता गर्भपात करण्याचा कोणताही परवाना आढळून आला नाही. तसेच येथे सापडलेल्या एका बॅगमध्ये पंडीत वाठोरे याच्या नावाचे इलेक्ट्रो होमिओपॅथी असोसिएशनचे ओळखपत्र, वेगवेगळ्या प्रकारच्या पेन किलर, अॅन्टी वायोटिक्स टॅब्लेट्स, गर्भपात करण्याचे एमपीटी किट्स, भूल देण्याचे इंजेक्शन यासह विविध प्रकारचे साहित्य मिळून आले. सदर साहित्य पंचासमक्ष जप्त करून हिमायतनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. यावरून संबंधित इसमाविरूद्ध हिमायतनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार कलम ८८, ६३ ,३(५) व वैद्यकीय व्यवसायी अधिनियम १९६१ नुसार कलम ३३(२),३३अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड












