भोकर प्रतिनिधी ज्योती सरपाते दि.१७: भोकर येथे ओबीसी आरक्षण बचाव समर्थनार्थ रविवार दि. १८ ऑगस्ट २०२४ सकाळी ११ वाजता
भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्यास हजारोंच्या संख्येनी, उपस्थीत राहावे असे आवाहन सकल ओबीसी समाज तर्फे करण्यात आले आहे.
रविवार दि १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता भोकर येथील मोंढा मैदानात जिल्हास्तरीय ओबिसी आरक्षण बचाव मेळावा आयोजित केला आसून या मेळाव्यास ओबिसी आरक्षण बचाव योद्धा प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थीत राहून मार्गदर्शन करणार आहेत तरी ओबीसी आरक्षणात होत असलेली मराठा समाजाची घुसखोरी रोकण्यासाठी जिल्ह्यातील सकल ओ बीसी, बहुजन बांधवानी हजारोंच्या संख्येनी उपस्थीत राहून हा मेळावा यशस्वी करावा असे आवाहन बहुजन नेते नागनाथराव घिसेवाड,ओबीसी नेते नागोराव शेंडगे बापू, सुभाष नाईक यांनी केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड
