“कोणत्याही प्रवर्गातील कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही मनपा आयुक्तांने दिले आश्वासन”
नांदेड दि.६ :नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचा आकृतीबंध व सेवा प्रवेश नियम शासनाने मंजुर केल्यानुसार नजिकच्या कालावधीत मनपा आस्थापनेवरील विविध पदांवर पदोन्नतीची प्रक्रिया पार पाडण्यात आलेली असुन सदरील पदोन्नती प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे पार पाडण्यात आली असल्याचे प्रतिपादन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचा आकृतीबंध शासन निर्णय दि. १४. फेब्रुवारी २०२३ अन्वये मंजुर झालेला आहे. तसेच शासन निर्णय दि. ११. मार्च २०२४ अन्वये नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम २०२४ मंजुर झालेला आहे. त्यानुसार महानगरपालिका आस्थापनेवर कार्यरत असलेल्या अधिकारी/ कर्मचारी यांना अधिक्षक, वरिष्ठ लिपिक, उप अभियंता, उच्च लघुलेखक (मराठी /इंग्रजी), अग्निशमन प्रणेता (लिडींग फायरमन) या पदावर महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दिनांक ०७ मे २०२१ मधील तरतुदीनुसार रिक्त असलेल्या पदावर पात्र अधिकारी/ कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
वास्तविक पाहता महानगरपालिका आस्थापनेवरील वरीष्ठ लिपिक या पदावर कार्यरत असलेल्या ०३ पात्र कर्मचाऱ्यांना अधिक्षक या पदावर पदोन्नती दिलेली असुन वरिष्ठ लिपिक संवर्गातील जेष्ठतेनुसार ०४ कर्मचाऱ्यांना शासन निर्णय दि.२५. मे २००४ नुसार आरक्षणाचा लाभ घेवून वरच्या स्थानावर आल्यामुळे शासन निर्णय दि.०७. मे २०२१ नुसार पदोन्नती दिलेली नाही तसेच ०३ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या पदाची शैक्षणिक अर्हता धारण करीत नसल्यामुळे पुढील पदोन्नती देण्यात आली नाही.
त्याचप्रमाणे महानगरपालिका आस्थापनेवरील लिपिक-टंकलेखक या पदावर कार्यरत असलेल्या पात्र ५६ कर्मचाऱ्यांना वरिष्ठ लिपिक या पदावर पदोन्नती दिलेली असुन लिपिक-टंकलेखक संवर्गातील जेष्ठतेनुसार १२ कर्मचाऱ्याऱ्यांना पदोन्नतीच्या पदाची शैक्षणिक अर्हता धारण करीत नसल्यामुळे, २६ कर्मचाऱ्यांना मराठी-३० इंग्रजी-४० टंकलेखन प्रमाणपत्र नसल्यामुळे तर १६ कर्मचाऱ्यांना अपहार एसीबी प्रकरणी विभागीय ,न्याया, चौकशी , मुळ नियुक्ती न्याय प्रविष्ठ ,जात वैधता प्रकरण न्यायप्रविष्ठ व विभागीय चौकशी चालू असल्याने मोहरबंद पाकीटात ठेऊन या विविध कारणास्तव निवड समितीने पदोन्नतीस अपात्र ठरविण्यात आले असल्याने त्या कर्मचाऱ्ऱ्यांना पदोन्नती देण्यात आली नाही.
तसेच महानगरपालिका आस्थापनेवरील अग्निशामक (फायरमन) या पदावर कार्यरत असलेल्या पात्र ०१ कर्मचाऱ्यास अग्निशमन प्रणेता (लिडिंग फायरमन) या पदावर पदोन्नती दिलेली असुन ३ अग्निशामक (फायरमन) कर्मचाऱ्यांना शैक्षिणक अर्हता , अग्निशमन प्रशिक्षण नसल्यामुळे पदोन्नती देण्यात आलेली नाही. तसेच आस्थापनेवरील लघुलेखक (इंग्रजी) या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यास इंग्रजी लघुलेखन-१२० व मराठी लघुलेखन १०० प्रमाणपत्र नसल्यामुळे पदोन्नतीस अपात्र ठरविण्यात आले आहे.
त्याचपध्दतीने महानगरपालिका आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता या पदावर कार्यरत असलेल्या पात्र ०६ कर्मचाऱ्यांना उपअभियंता या पदावर पदोन्नती दिलेली असुन कनिष्ठ अभियंता संवर्गातील ०१ कर्मचाऱ्यास ए.सी.बी. प्रकरणी न्यायालयीन चौकशी चालू असल्यामुळे मोहरबंद पाकीटात ठेवण्यात आले असुन ०३ कर्मचाऱ्यांना व्यावसायीक परीक्षा उत्तीर्ण नसल्यामुळे तसेच वयोमर्यादा ४५ वर्ष पूर्ण झाली नसल्यामुळे त्यांना व्यावसायीक परीक्षेतून सुट मिळाली नसल्याने पदोन्नती देण्यात आली नाही.
या पदोन्नती प्रक्रियेमध्ये प्रचलित शासन नियमातील तरतुदी व शासनाने मंजुर केलेल्या सेवा प्रवेश नियमातील अर्हता व पदोन्नतीचे निकष विचारात घेऊन अगदी पारदर्शकपणे ही संबंध प्रक्रिया पार पाडण्यात आली असुन याबाबतीत कर्मचाऱ्याऱ्यांच्या अपात्रतेबाबत काही आक्षेप असल्यास तशा तक्रारी/निवेदन प्राप्त झाल्यास पुनःश्च पडताळणी करुन नजीकच्या पदोन्नती समिती बैठकीमध्ये फेर विचारासाठी ठेवण्यात येणार असुन मनपा कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठता व गुणवत्ता तत्वावर मिळणारी पदोन्नती ही सातत्यपूर्ण प्रक्रिया असल्यामुळे यामध्ये कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही असे प्रतिपादन मनपा आयुक्तांनी केले आहे.
तसेच यापूर्वी महापालिकेत दि.०१. ऑक्टोबर २०१८ रोजीच्या आदेशान्वये मागासवर्ग कक्ष कार्याविन्त करण्यात आला असून, सध्यस्थितीत सदर कक्षातील काही अधिकारी/कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असल्यामुळे त्यांचे ठिकाणी इतर अधिकारी/कर्मचारी यांची नव्याने नेमणूक करण्यात येत असल्याचे यावेळी आयुक्तांनी सांगितले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड