नांदेड दि५ : मुदखेड ते नांदेड रस्त्यावरील गोदावरी नदी पात्रात एका २८ ते ३० वर्षीय अनोळखी तरूणाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ही घटना ४ ऑक्टोबर रोजी दुपारी आमदुरा येथील गोदावरी नदीचे पात्रात निदर्शनाला आली आहे.
आमदुरा (ता. मुदखेड) येथील पोलीस पाटील प्रताप पवार यांनी ४ ऑक्टोबर रोजी दुपारी बीट पोलीस अंमलदार महेंद्र कौठेकर व विजय आलेवार यांना आमदुरा शिवारातील गोदावरी नदी पात्रात एका अनोळखी तरूणाचे प्रेत तरंगत असल्याचे सांगितले. ही माहिती समजताच बीट अंमलदार महेंद्र कौठेकर व विजय आलेवार हे दोघेजण तातडीने घटनास्थळी जावून पाहणी केली. दरम्यान, तेथे त्यांना एका अनोळखी तरूणाचे प्रेत नदीचे पात्रात तरंगताना आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून तरूणाचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विष्णूपुरी, नांदेड येथील शासकीय रूग्णालयात हलविण्याची व्यवस्था केली. गोदावरी नदी पात्रात तरंगताना आढळलेल्या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नाही. अनोळखी मृत तरूणाच्या अंगावर काळ्या रंगाची जीन्स पँट, फिक्कट फूल शर्ट, निळ्या रंगाची अंडरपॅंट व उंची ५ फूट ७ इंच असून, वय अंदाजे २८ ते ३० वर्षे असावे. सदर तरूणाचे प्रेत विष्णूपुरी, नांदेड येथील शासकीय रूग्णालयातील शीतगृहात ठेवण्यात आले असून, मयताच्या संबंधित नातेवाईकांनी अधिक माहितीसाठी मुदखेड पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन बीट पोलीस अंमलदार महेंद्र कौठेकर व विजय आलेवार यांनी केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड














**mitolyn reviews**
Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.