नवरात्री उत्सवात रंगला महापुरुषांच्या विचाराचा जागर
तुषार कांबळे
हिमायतनगर दि.१७: मागील नऊ दिवसापासून दुर्गा महोत्सवा निमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते, त्यात मुख्यत्वे स्त्री शक्तीचा जागर व्हावा, त्यांना या आधुनिक युगात सन्मानाने जगता यावं, आपल्या अस्तित्वाची जाणीव व्हावी, स्त्री ही अबला नसून सबला आहे ही बिरुदावली तिच्या मनावर कोरली जावी या उद्देशाने अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात, याचं प्रकारे हिमायतनगर येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वस्तीग्रहात या नवरात्रीनिमित्त एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला त्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर येथे शासकीय आदिवासी मुलींच्या वस्तीग्रह येथे ग्रहपाल नम्रता बागडे आणि वर्षा शेळके यांच्या संकल्पनेतून नवरात्रीनिमित्त महामानवांच्या विचारांची व्याख्यानमाला नऊ दिवस आयोजित करण्यात आलेली होती, यात स्त्री शिक्षण, स्त्रीभ्रूणहत्या, स्त्रियांचे समाजातील स्थान, त्यांचे हक्क व अधिकार, अंधश्रद्धा निर्मूलन, कायदे व त्याचा वापर, आरोग्य, स्त्रियांचे राजकीय अस्तित्व, विविध आजार आणि उपाययोजना आदी विषयावर परिसरातील नऊ मान्यवर व्यक्तींचे मार्गदर्शन करण्यात आले. यात प्रामुख्याने साबळे साहेब, एच. आय. व्ही, समुपदेशक, शिंदे मॅडम, डोंगरे सर, शहनाज मॅडम, डॉ. वाकोडे, डॉ. धुमाळे, डॉ. खूपसे, प्रकल्प कार्यालय किनवट येथील मेथे सर, डॉ. किसने सर, डॉ. गायकवाड डी. डी, सोनटक्के सर, संतोष डवरे सर, आदींनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार आणि प्रास्ताविक हे सर्व बाबी येथील मुलींनीच पार पाडले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वस्तीग्रहाच्या गृहपाल बागडे नम्रता यांच्या पुढाकारातून क्रांतिवीर बिरसा मुंडा,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज , छत्रपती शिवाजी महाराज आदी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते नियमितपणे करून त्यांच्या विचाराची जोपासना करत त्यांची शिकवण प्रत्यक्ष आचरणात आणण्याची शपथ घेण्यात आली. यावेळी लिपिक मिरा बिरादार, संदीप धुताडे, श्री. देवतळे, आणि वर्षा शेळके आदींनी परिश्रम घेतले. तर गौरी टारफे, तुळसा डवरे, रुपाली लोखंडे, अश्विनी डवरे, प्रतिक्षा बुरकुले, कविता डाके, नयन ढोले, अनुसया मिराशे आदीसह अनेक मुलींनी यात सक्रिय सहभाग घेतला होता. प्रकल्प कार्यालय किनवट अंतर्गत येणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील वस्तीगृहापैकी या वस्तीग्रहाणे हा आगळावेगळा उपक्रम राबवून समाज प्रबोधनाचा आणि आधुनिक तेचा एक नवा पायंडा पाडला आहे असे मत पालकातून व्यक्त होत आहे.
“मुलींना शिक्षणाबरोबरच त्यांचे अधिकार हक्क याची जाणीव करत एक सामाजिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन मिळावे, या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, नवरात्रीमध्ये आम्ही नव विचाराची जोपासना करण्याचा संकल्प केला होता याचे आम्हास समाधान आहे : ग्रहपाल नम्रता बागडे मॅडम.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड














**mitolyn**
Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.