

हिमायतनगर प्रतिनिधी/- हदगाव हिमायतनगर विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजल्यानंतर कोणाला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्याच दरम्यान महायुतीची उमेदवार मिळविण्यासाठी शिंदे गट, भाजप आता त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे व्यंकटेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे ही जागा राष्ट्रवादीला सोडून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले असल्याचे समजत आहे त्यामुळे हदगाव विधानसभेच्या तिकिटासाठी महायुती मध्ये मोठी रस्सीखेच होत असल्याचे दिसून येत आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर जो तो उमेदवार आपापल्या पक्षाकडे उमेदवारी मिळविण्यासाठी धडपड करत असल्याचे दिसून येत आहे सर्वच इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. कोणाला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी जाहीर होते हे सांगणे सध्यातरी कठीण आहे. हदगाव हिमायतनगर विधानसभेसाठी महाविकास आघाडी बरोबर आता महायुतीतील भाजप, शिवसेना आणि अजितदादा गटातील इच्छुक उमेदवारांची ह्या जागेसाठी रस्सीखेच सुरु झाली आहे. नुकतेच हिमायतनगर येथे राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या सर्वच तालुकाध्यक्षांची बैठक झाली, यावेळी महायुतीच्या उमेदवाराकडून सन्मानाची वागणूक दिली जात नसल्याचे त्यात उघड झाले आहे. एव्हढंच नाहीतर हि जागा मिळविण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजिदादांच्या माध्यमातून व्यंकटेश पाटील तालगकर यांचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगन्यात आले आहे. त्यामुळे हदगावची उमेदवारी कोणाला व कोणत्या मित्र पक्षाला सुटते..? याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून आहे…

◾चौकट◾
कोण आहेत व्यंकटेश पाटील तालंगकर ?
हदगाव तालुक्यातील तालंग येथील व्यंकटेश पाटील यांचे शालेय शिक्षण हे गावांमध्ये झाले व हायस्कूल साठी त्यांनी नांदेड व हदगाव येथे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी सायन्स ग्रॅज्युएट होऊन एमबीए चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी कार्पोरेट क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला पुणे आणि नंतर मुंबईमध्ये कार्पोरेट कंपनीमध्ये जॉब केला. हे जॉब करत असतानाच त्यांची एका कामानिमित्त अजितदादा सोबत संबंध आला. त्या भेटीमध्येच व्यंकटेश पाटील यांना अजितदादाचे नेतृत्व,कर्तृत्व यांनी प्रभावित केलं. त्यानंतर अजितदादांनी त्यांना राजकारणात येण्यासाठी आग्रही केलं. आणि इथून पुढे त्यांचा राजकीय प्रवास चालू झाला. व्यंकटेश पाटील यांनी अजितदादांच्या मार्फत हदगाव हिमायतनगर तालुका तसेच नांदेड जिल्हा व राज्यातील इतर लोकांसाठी काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी असे काही प्रश्न तालुक्यातील जिल्ह्यातील सोडवले त्यावेळेसच्या स्थानिक आमदाराला सुद्धा ते करता नाही आलं असे प्रश्न त्यांनी अजितदादा मार्फत जनतेसाठी सोडवण्यास सुरुवात केली. कोणतेही प्रश्न असू दे शेतकऱ्याचा प्रश्न असू दे का इतर बचत गट अंगणवाडी असं सामाजिक व वयक्तिक कोणतंही असू दे त्यांनी ते कुठलेही राजकीय पाठबळ नसताना त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. पक्षात काम करत असतानाच त्यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरद पवार साहेब यांच्यासोबत सुद्धा संबंध आला. 2014 नंतर शरद पवार साहेबांनी व्यंकटेश पाटलांना खूप जवळ केले. नेहमीच्या पवार साहेबांच्या भेटीमध्ये वेगवेगळ्या विषयावर चर्चा व्हायची तो उद्योगाचा विषय असो का सामाजिक विषय असो का हदगाव मतदार संघ तसेच नांदेड जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा विषय असो. शरद पवार साहेब तसेच अजितदादांनी 2019 ला व्यंकटेश पाटलासाठी मतदारसंघ सोडून घेण्याचा आटोकाट प्रयत्न सुद्धा केला होता पण त्यावेळेस दुर्दैवाने त्यांना व पक्षाला यश आले नाही. अजितदादांचा सहवास तर त्यांना लाभलाच पण पवार साहेबांच्या सहवासाने सुद्धा व्यंकटेश पाटलांचे नेतृत्व अजूनच परिपक्व व जाणकार झाले. व्यंकटेश पाटलाच्या राजकीय जीवनामध्ये या दोन व्यक्तीचा खूप मोठा प्रभाव हा राहिला आहे. त्यामुळे 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी अजित दादाकडे हदगाव मतदार संघ हा महायुतीकडून सोडून घेण्यात यावा आणि व्यंकटेश पाटील यांना हदगावचे नेतृत्व करण्याची संधी देण्यासाठी त्यांनी अजित दादाकडे जोरदार प्रयत्न चालू केले आहेत.