हिमायतनगर प्रतिनिधी/- नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते त्याच धर्तीवर दिनांक 15 जून रोजी बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प क्रमांक तीन नांदेडच्या वतीने हिमायतनगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील छत्रपतीनगर येथील अंगणवाडी क्रमांक 20 मध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रवेश उत्सव सोहळा आयोजित करून अंगणवाडी मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पाल्यांचा सत्कार करून येथील अंगणवाडी कार्यकर्त्या रचना वसंतराव लंगडे ( शंक्करगे) यांनी खाऊचे वाटप केले
याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील छत्रपती नगर येथील अंगणवाडी क्रमांक 20 मध्ये दिनांक 15 जून रोजी सकाळी बाल विकास प्रकल्प अधिकारी नांदेड प्रकल्प क्रमांक तीन यांच्या आदेशानुसार अंगणवाडी मध्ये येणाऱ्या विद्यार्थी व पालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत उपस्थित विद्यार्थ्यांना मान्सूनपूर्व उपाय योजनांचे मार्गदर्शन करण्यात आले यावेळी अंगणवाडी कार्यकर्त्या रचना वसंतराव लंगडे ( शंक्करगे) यांनी येथे उपस्थित असलेल्या गरोदर माता यांचे पुष्पहार घालून स्वागत केले व वयोगट तीन ते सहा मधील लहान मुलांना त्यांनी पोषण आहार देऊन त्यांच्या वजन उंचीनुसार त्यांचे ग्रेड काढत त्यांच्या आहाराविषयी माहिती त्यांच्या पाल्यांना दिली यावेळी या परिसरातील असंख्य महिला व लहान थोर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते