हिमायतनगर प्रतिनिधी/-संपूर्ण महाराष्ट्रासह मराठवाड्यात सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे मा.श्री. गोरखनाथ राऊत यांची नुकतीच सावता परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करून त्यांचा सन्मान करण्यात आला
याबाबत सविस्तर वृत्त असे की संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी समाजासह माळी समाजाची धुरा सांभाळणारे सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्य कार्यकारणीवर निवड जाहीर केली त्यात सावता परिषदेचे संपूर्ण मराठवाड्यासह महाराष्ट्रात अविरतपणे कार्य करणारे अडल्या-नडल्यांची मदत करणारे व समाज संघटन वाढीमध्ये नेहमी अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या व कल्याण आखाडे यांच्या खांद्याला खांदा लावुन गेली अनेक वर्षांपासून संघटना वाढीसाठी सावता परिषदेचे कार्य करत असलेले स्वाभीमानी, ध्येय वेढे, असे गोरखनाथ राऊत यांची नुकतीच संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी सावता परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची निवड करून त्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान केला त्यामुळे हिमायतनगर येथील सावता परिषदेचे तालुका अध्यक्ष संतोष मोहनराव सातव यांच्या सह समस्त तालुक्यातील माळी समाज बांधवांना कडून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे….