नांदेड दि.३ फेब्रुवारी: नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे दिवंगत लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे आज दुपारी नांदेडमध्ये आगमन झाले आहे.
दि. 02 फेब्रुवारी 2026 रोजी अजितदादांच्या अस्थी कलशाचे दर्शन घेण्यासाठी दुपारी 4:00 वाजल्यापासून माझ्या साई-सुभाष, वसंतनगर, नांदेड येथील जनसंपर्क कार्यालयात ठेवण्यात आला आहे.
या अस्थीकलशाचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष सौ.मीनलताई पाटील खतगावकर, उमरी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक कैलास देशमुख गोरठेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कन्हैया कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर कार्याध्यक्ष सुरजीतसिंघ गिल, नेताजीराव भोसले, बालाजी पाटील शेळके, माधव पाटील चिचांळे, संतोष शिरसागर, दीपक पावडे, बाबुराव पुजरवाड, रंगराव लोंढे, माणिक देशमुख तरोडेकर, रोहन कांबळे, गणेश पाटील शिंदे मरळकर, बळी पाटील जानापुरीकर, संजय अंभोरे, एकनाथराव वाघमारे, दासराव पुयड, एडवोकेट बाळासाहेब सोनकांबळे, रमेशराव गांजापुरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दर्शन घेतले.
तरी उद्या मंगळवार, दि.3 फेब्रुवारी रोजी सकाळी साई सुभाष यांचे संपर्क कार्यालय, वसंतनगर, नांदेड येथून असती कलश यात्रा सकाळी 8:00 वाजता निघणार आहे. अजितदादांवर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेने अस्थिकलशाचे दर्शन घ्यावे,असे आवाहन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.












