अंबाजोगाई प्रतिनिधी दि.१०: अंबाजोगाई शहरातील समीर ट्रॅव्हल्स चे मालक डिजिटल मीडिया परिषदेचे तालुका संघटक तसेच दैनिक रणझुंजार चे तालुका प्रतिनिधी सय्यद नईम वजीर व त्यांच्या संपूर्ण परिवारातर्फे नुकत्याच झालेल्या रमजान ईद निमित्त ईद मिलाप चा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले राजकीय, प्रतिष्ठित नागरिक,डॉक्टर्स स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी,आंबेजोगाई तालुक्यातील पत्रकार, वकील,व शासकीय अधिकाऱ्यासहित मित्र परिवानी या कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवली त्याबद्दल परिवाराच्या वतीने सर्वांचे स्वागत करून धन्यवाद व्यक्त केले आहे
प्रेम वाटलं तर प्रेम मिळतं या आई-वडिलांच्य संस्कारावर विश्वास ठेवून आम्ही तिन्ही बंधू अशा कार्यक्रमास पुढाकार घेत असतो येणाऱ्या सर्व मान्यवरनी( सय्यद वजीर हैदराबाद बँकेचे निवृत्त कर्मचारी ) यांच्या सर्व परिवाराला भरभरून शुभेच्छा दिल्या
आपण या कार्यक्रमाला आलात त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली येणाऱ्या सर्व पाहुण्या व मित्र परिवाराचे आभार सय्यद समीर व सय्यद नजीर यांनी मानले हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी येणाऱ्या मान्यवरांनकडे आवर्जून लक्ष मोहम्मद फैजान, इजहार भाई फिरोज, जावेद, बाबा, आदिल, तसेच लहान मुलांनी रियाज रेहान अरमान परी मन्नत अनस यांनी मेहनत घेतली.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड #अंबाजोगाई