नांदेड येथील ईनरव्हील क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात साजरा.
नांदेड दि.१३: नांदेड जिल्ह्यामध्ये महिलांच्या सक्षमीकरणासह महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणारी , महिलांसाठी विविध उपक्रम राबवणारे ईनरकील कलब ऑफ नांदेडचा पदग्रहण सोहळा मा. श्रीमती अरुणा संगवार मॅडम उपजिल्हाधिकारी नांदेड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना संगवार मॅडम यांनी असे सांगितले की इनरव्हील क्लबच्या महिलांचे कार्य खूप मोलाचे असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
या पद ग्रहण सोहळ्याचां कार्यक्रम नांदेड येथील हॉटेल अतिथी येथे पार पडला यावेळी इनरव्हील क्लबच्या नुतन अध्यक्षा सौ. विमल येन्नावार यांनी सौ. जयश्री राठोड मागील अध्यक्षा यांच्याकडून पदभार स्वीकारला व सौ. सोनाली देशमुख यांनी मागील वर्षाच्या सचिव सी. मिनाक्षी पाटील यांच्या कडून सचिव पदाची सुत्रे स्विकारली. उपाध्यक्ष पदाची सूत्रे मिनाक्षी पाटील, सहसचिव पदाची सुत्रे रेखा शर्मा, खजिनदार पदाची सूत्रे डॉ. उर्मिला मानू, आय.एस.ओ.पदाची सुत्रे मोनल रस्तोगी, एडीटर पदाची सूत्रे मुग्धा देशपांडे, सि.सि पदाची सूत्रे सुनिता चव्हाण, आणि सि.एल.सि. पदाची सुत्रे मेनका डेझील यांनी स्विकारली यावेळी मा. श्रीमती अरुणा संगेवार, उपजिल्हाधिकारी यांनी इनरव्हील क्लबच्या कामाचे कौतुक केले व या महीलांचे कार्य समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले तसेच येणाऱ्या काळात मुलींच्या सेल्फ डिफेन्ससाठी कार्यक्रम घेण्याचे आवाहन केले त्याचबरोबर इनरव्हील क्लबचे काम करत करत आपल्या पाल्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या महिलांचा सुद्धा गुणवंत पाल्य म्हणून सत्कार करण्यात आला त्यानंतर इनरव्हील क्लबच्या ध्येय-धारेणास अनुसरुन जेष्ठ सदस्या श्रीमती निता दागडीया यांनी गरजू दिव्यांग दापत्यास त्यांच्या अपत्याच्या गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंतचा पूर्ण खर्च उचलून दातृत्व स्विकारले आहे
या कार्यक्रमाच्या वेळेस डॉ. सुरेखा नांदेडकर, सौ. विमल धुत, डॉ. चित्रा पाटील, लता प्रेमचंदाणी, माया निहलानी, सुनाता मैग्या, आशा लव्हेकर, अलका काबरा, मिना मालीवाल, कृष्णा मंगनाळे, डॉ. पुष्पा गायकवाड, डॉ. विद्या पाटील, किर्ती मेवाळे, दिपाली पालीवाल, रत्ना जाजु, कल्याणी हुरणे, सुरेखा नेवारीकर, सुषमा काला यांची विशेष उपस्थिीती होती. च इतर सर्व सदस्य उपस्थिती होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन नेहा पायरोकर यांनी केले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड
