मुदखेड प्रतिनिधी शेख जब्बार दि.२३: दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुदखेड शहरात दि. ३ मार्च २०२४ रोजी दुसऱ्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असुन
या अनुषंगाने दि.२३ फेब्रुवारी रोजी शहरातील बौद्ध भूमी प्रशिक्षण केंद्र येथे भंन्ते शीलरत्न थेरो यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये परिषदेच्या मंडपाचे भूमिपूजन व पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रथमता बौद्ध भिकू संघ यांच्या वतीने तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील ग्रहण करून धम्म परिषदेच्या मंडपाचे भूमिपूजन करून पत्रकार परिषदेस सुरुवात करण्यात आली. या परिषदेच्या प्रसंगी भन्ते शिलरत्न थेरो यांनी सांगितले की दि.३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या धम्म परिषदेचे उद्घाटन भदन्त डॉ.प्रा.एम. सत्यपाल महाथेरो (औरंगाबाद) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच धम्म ध्वजारोहण सकाळी ठीक ९ वाजता भदन्त धम्मसेवक महाथेरो (मुळावा) यांच्या हस्ते होणार. व भव्य धम्म मिरवणूक सकाळी ठीक ९:३० वाजता बौद्ध भूमी प्रशिक्षण केंद्र येथून शहरातील प्रमुख मार्गाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या पुतळ्याच्या नियोजित ठिकाणा पासून बुद्धभूमी प्रशिक्षण केंद्र येथे रॅलीची सांगता होणार. यानंतर बुद्धभूमी प्रशिक्षण केंद्र येथे भिकू संघाच्या उपस्थितीत बुद्ध मूर्तीची स्थापना होणार असल्याची माहिती भदंत शीलरत्न थेरो यांनी दिली आहे.
तसेच धम्मदेसना देण्यासाठी महाराष्ट्रातून असंख्य बौद्ध भिखू उपस्थीत राहणार आहेत.
यानंतर संध्याकाळी ८ वाजता महाराष्ट्राचे महागायक अजय देहाडे, चेतन लोखंडे, शुभम मस्के, यांच्या बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले.
या दुसऱ्या धम्म परिषदेला तालुक्यातुन व जिल्ह्यातुन सर्व बौद्ध अनुयांनी उपस्थित रहावे असे आवाहन मुदखेड येथील नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट, धम्म परिषद आयोजन समिती व महामाया महिला मंडळ यांच्यावतीने करण्यात आले.
यावेळी भन्ते गगनबोधी, भन्ते महेंद्रबोधी, लॉर्ड बुद्धा चॅनलचे नांदेड जिल्हा प्रातिनिधी सदाशिव गच्चे,यासह बौद्ध बांधवांची उपस्थीती होती.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड