जिवाजी महाले चौकाजवळ लोखंडी कठडे बसवण्याची होतेय मागणी.
ता. प्र :- दत्तात्रय सज्जन
धर्माबाद दि.१० :- धर्माबादहून तेलंगाना मध्ये जाणाऱ्या महामार्गावरील कठीण वळणामुळे अनेक अपघात घडत असून या वळणावर पूर्वीप्रमाणे लोखंडी कठडे बसविण्यात यावे अशी मागणी होत आहे.
धर्माबादहून चिंचोली,नायगाव, बेलूर कंदाकुर्ती मार्गे तेलंगणामध्ये जाणाऱ्या प्रवासी व वाहन धारकांची या रस्त्यावरून नेहमी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.धर्माबाद शहर बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असल्याने येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची रेलचेल राहते. त्यामुळे बेलूर फाटा येथील जिवाजी महाले चौकाजवळ वळण अतिशय कठीण बनले असून अश्या अनेक वळणावर दुचाकी ,तीनचाकी, चारचाकी या वाहनाचे अपघात घडत आहेत. पायोनियरमार्गे चिंचोली,नायगाव बेलूर, कंदाकुर्ती मार्गे तेलंगाना जाण्यासाठी हा रस्ता प्रवाशांना व वाहनधारकांना सोयीस्कर व कमी अंतराचा पडत असल्याने व या रस्त्याचे रुंदीकरण झाल्याने प्रवासी वाहने अतिशय सुसाट वेगाने धावत आहेत यासाठी या कठीण वळणावर अपघातांची भीती वाढली आहे म्हणून या वळणावर पूर्वीप्रमाणे लोखंडी कठडे बसवण्यात यावे अशी मागणी प्रवाश्यांमधून होत आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड