विजय पाटील
छत्रपती संभाजी नगर दि.२०: आधारवाडी तांडा (ता. सिल्लोड) येथे शनिवारी (१९ एप्रिल) सकाळी युवकाने विष पिऊन आत्महत्या केली. सचिन शिवदास राठोड (वय ३०) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
सचिनने विष पिल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तत्काळ सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात त्याला दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सचिनच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. त्याच्या पार्थिवावर दुपारी दोनला अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
फुलंब्री तालुक्यात युवकाने घेतला गळफास
फुलंब्री तालुक्यातील वडोदवाडी येथे गुरुवारी (१७ एप्रिल) सकाळी ८:३० च्या सुमारास कौतिक तुळशीराम दुधे (३७) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. कौतिक सकाळी घरातून बाहेर गेले, नंतर स्वतःच्या शेतात सकाळी गळफास घेतल्याचे आढळले. त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत्यू घोषित केले.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजी नगर
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!